health

जेवल्या नंतर तुम्हाला पण येतात सारख्या ढेकर, एखाद्या आजाराचे संकेत तर नाहीत ना?

ढेकर येणे ही पचनक्रियेच्या संबंधित एक सामान्य क्रिया आहे, जी भोजन केल्या नंतर होते. सामान्य पणे लोकांचे मानणे आहे कि ढेकर येणे पचनक्रियेशी संबंधित आहे. पण जर जर आपल्याला सामान्य पेक्षा जास्त ढेकर येत असतील तर आपल्याला या मागील कारण शोधून काढणे गरजेचे आहे. जेवण जेवल्या नंतर वेळोवेळो ढेकर येण्याचा अर्थ जास्त प्रमाणात हवा शरीरामध्ये गेलेली आहे. जेव्हा हवा आत मध्ये जाते तेव्हा ती ढेकर बनून बाहेर येते.

ही पोटातील गैस बाहेर निघण्याची एक नैसर्गिक पध्द्त आहे आणि जर पोटातून हवा बाहेर निघाली नाही तर पोटाच्या अनेक समस्यांना जन्म देऊ शकते. पण जास्त ढेकर येणे देखील काही आजारांचे संकेत आहे.

इरिटेबल बाउल सिंड्रोम

या आजारा मध्ये रुग्णाला बद्धकोष्ठता, पोटदुखी, मुरड आणि जुलाब होऊ शकतात. सोबतच या आजाराचे एक मोठे लक्षण अधिक जास्त ढेकर येणे देखील आहे. या समस्ये शिवाय पेष्टिक अल्सर च्या कारणामुळे देखील ढेकर येऊ शकतात.

डिप्रेशन

तणाव अनेक समस्यांचे कारण बनतो. तणाव किंवा एखाद्या मोठ्या भावनात्मक बदलाचा प्रभाव आपल्या पोटावर देखील पडतो. जवळपास 65 टक्के बाबतीत मूड मध्ये त्वरित आणि मोठा बदलाव किंवा तणाव वाढणे हे ढेकर येण्याचे कारण होते.

अल्सर

जास्त ढेकर येण्यामुळे पोटामध्ये बद्धकोष्ठ, गैस, जुलाब आणि मुरडा मारणे या सारख्या समस्या होतात. या समस्यांना सामान्य समजून लोक यावर उपचार करत नाहीत. ज्यामुळे या समस्याच वाढतात. यामुळे पोटाचा अल्सर सारखी गंभीर समस्या होऊ शकते.

एरोफेजिया

बहुतेक वेळा असे होते कि अन्न सेवन करतांना जास्त हवा पोटा मध्ये घेतो त्यामुळे ढेकर येऊ लागतात. अश्या स्थितीला एरोफेजिया म्हणतात. या समस्ये पासून वाचण्यासाठी लहान घास घ्यावेत आणि तोंड बंद करून हळू-हळू अन्न चावून गिळावे.

बद्धकोष्ठता

ज्यालोकाना जास्त ढेकर येतात त्यापैकी 30 टक्के लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. याच सोबत अपचनामुळे देखील ढेकर येतात.

का येतात सारख्या ढेकर?

अनेक लोक घाईघाईने मोठ-मोठे घास घेऊन खातात. यामुळे पचनावर परिणाम होतो आणि जास्त ढेकर येतात.

खातांना किंवा जाम्बही देतांना मोठे तोंड उघडल्याने पोटात जास्त हवा जाते. ज्यामुळे ढेकर येतात.

डायजेशन खराब झाल्यामुळे बद्धकोष्ठ किंवा अपचन होते. यामुळे पोटामध्ये गैस बनतो आणि ढेकर येते.

पोट रिकामे असतांना पोटाच्या रिकाम्या जागी हवा भरते. ही हवा ढेकर बनून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते.

कार्बोनेटेड ड्रिंक्स, जंक फूड, कोबी, हिरवे वाटाणे, डाळ यासारखे फूड पोटात गैस बनवतात. यांना खाण्या-पिण्या नंतर जास्त ढेकर येते.


Show More

Related Articles

Back to top button