entertenment

बॉलीवूडचे हे 5 सुपरस्टार फिल्म साइन करण्याच्या अगोदर करतात अशी स्पेशल डिमांड, जी पूर्ण करताना डायरेक्टरला सुटतो घाम

तुम्ही ऐकले असेल की बरेचसे स्टार्स फिल्म साइन करण्याच्या अगोदर आपल्या काही अटी डायरेक्टरला सांगतात ज्यांना पूर्ण करणे बंधनकारक आहे असे ते सांगतात. तर सुपरस्टार कलाकार असेल तर त्याची ही डिमांड पूर्ण करण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो. पण जर सुपरस्टार चित्रपटा मध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी त्याच्या मना सारखे करावेच लागते. चला पाहू हे 5 बॉलीवूड स्टार कोण आहेत आणि त्यांच्या काय डिमांड असतात.

सलमान खान

सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. सलमानचे जगभरात लाखो फैंस आहेत त्याच्या चित्रपटाची ते वाट पाहत असतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की कोणताही चित्रपट साइन करण्याच्या अगोदर सलमान डायरेक्टर समोर एक डिमांड करतो की चित्रपटामध्ये त्याचा एकही किसिंग सीन नाही पाहिजे. त्याची पॉलिसी आहे की “नो किसिंग, नो बैड शॉट”.

शाहरुख खान

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान देखील डिमांड करतो. सलमान प्रमाणे शाहरुख देखील किसिंग सीन करणे टाळतो पण यशराजच्या समोर त्याला आपला हा नियम मोडावा लागला.

अक्षय कुमार

जसे की तुम्हाला कदाचित माहित असेलच की अक्षय कुमारच्या फिट बॉडी मागे त्याची कडक शिस्त आहे. तो वेळेवर झोपतो आणि उठतो. संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान तो जेवण करतो आणि झोपतो. तो आपले अतिशय शिस्तीने जगतो. त्यामुळे फिल्म साइन करण्या अगोदर आपल्या डिमांड सांगतो. त्याची पहिली डिमांड असते की तो संडेला काम करणार नाही आणि गरज असेल तरच रात्री उशिरा पर्यंत काम करेल.

ह्रितीक रोषण

बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्यां पैकी हा एक आहे. याला प्रवास आवडत नाही आणि जर त्याला प्रवास करावाच लागला तर त्याची डिमांड असते की त्याचा शेफ त्याच्या सोबत घ्यावा लागेल. ह्रितिक आपल्या जेवणा बद्दल सतर्क आहे आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी खाणे आवडत नाही.

अमीर खान

अमीर खान हा मिस्टर परफेक्शनिस्ट या नावाने देखील ओळखला जातो. त्याचा डायरेक्टला फिल्म साइनकरण्याच्या अगोदर पहिला प्रश्न असतो चित्रपटामध्ये लो लो एंगल शॉट आहे का? कारण त्याला लो लो एंगल शॉट आवडत नाही. त्याच सोबत अमीर डिमांड करतो की चित्रपटाच्या फायद्याचा काही भाग त्याला दिला जावा.


Show More

Related Articles

Back to top button