घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा लग्न करण्याची हिम्मत नाही करू शकत आहेत हे 6 सिलेब्रेटी, कारण जाणून घ्या

0
67

लग्न आणि घटस्फोट दोन्ही एकमेकांच्या अगदी अपोजिट आहे. एका मध्ये आनंद आहे तर दुसऱ्या मध्ये दुःख लपले आहे. जेव्हा व्यक्ती लग्न करतो तेव्हा त्याला असे वाटते कि हे नाते वर्षानुवर्षे व्यवस्थित चालेल. अश्यातच जर घटस्फोट झाला तर भरपूर दुःख होते. मंग पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात करणे आणि पुन्हा लग्न करण्याची मानसिकते मध्ये येणे अत्यंत कठीण आहे. आज आम्ही आपल्याला अश्याच बॉलिवूड सिलेब्रेटी बद्दल सांगत आहोत ज्यांनी घटस्फोट नंतर एखाद्या खास कारणामुळे पुन्हा लग्न न करणेच योग्य समजले.

ऋतिक रोशन : बॉलिवूड मधील सगळ्यात हैण्डसैम हिरो म्हणून ज्याची ओळख आहे तो ऋतिक रोशन याने हजारो मुलींचे हृदय मोडले जेव्हा त्याने 2000 साली सुजैन खान सोबत लग्न केले. लग्ना नंतर त्यांना दोन मुले देखील आहेत. परंतु नंतर दोघांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ लागला आणि 2014 मध्ये यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाचे कारण सुजैन चे अर्जुन रामपाल सोबतची जवळीक आणि ऋतिक चे कंगना सोबतचे रिलेशनशिप मध्ये असणे सांगळे जाते. पण घटस्फोटा नंतर काही वर्षाने ते पुन्हा चांगले मित्र बनले. पण ऋतिक ने पुन्हा लग्न नाही केले. तो सध्या आपल्या करियर वर फोकस करू इच्छितो. तसेच त्याला आपल्या टाइप ची दुसरी मिळाली नाही.

करिश्मा कपूर : 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री करिश्मा कपूर ने 2003 मध्ये दिल्लीचे बिजनेसमैन संजय कपूर सोबत लग्न केले होते. संजय पहिलेच घटस्फोटित होता. करिश्मा आणि संजय यांचे लग्न जास्त दिवस टिकले नाही आणि दोघांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला. करिश्माला या लग्ना नंतर दोन मुले आहेत जे तिच्या जवळ असतात. या लग्नाने करिश्माला जो अनुभव भेटला त्यानंतर दुसरे लग्न ती अत्यंत विचारपूर्वक करू इच्छिते. तिचा एक बॉयफ्रेंड असल्याचे बोलले जाते. कदाचित भविष्यात ते दोघे लग्न करतील.

अमृता सिंह : सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचे 1991 साली लग्न झाले होते पण नंतर 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. नंतर सैफ ने करीना सोबत लग्न केले पण अमृता ने मुलांच्या संगोपन करण्यात व्यस्त झाल्याने सिंगल राहणेच योग्य समजले. आज अमृता सिंह आणि सैफ ची मुलगी सारा इंडस्ट्री मध्ये काम करत आहे. तर मुलगा इब्राहिम देखील बॉलिवूड मध्ये लवकरच एंट्री घेऊ शकतो.

मनीषा कोइराला : एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 40 वर्ष वय पार झाल्या नंतर लग्न केले होते. तिचे लग्न 2010 मध्ये नेपाळ चे बिजनेसमैन सम्राट दहल सोबत केले होते. पण लग्ना नंतर दोन वर्षा नंतर 2012 मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटा नंतर ती उदास होती, लग्ना बद्दल ती आत्मविश्वास गमावून बसली होती. नंतर ती कैंसरची शिकार झाली. त्यामुळे तिने दुसरे लग्न  करण्याच्या ऐवजी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे योग्य समजले.

कोंकणा सेन : कोंकणा आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते तिने 2010 मध्ये अभिनेता रणवीर शूरी सोबत लग्न केले होते. पण 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. यांचा एक मुलगा आहे जो कोंकणा सोबत राहतो. घटस्फोटा नंतर कोंकणाला सध्या दुसरे लग्न करण्यात इंटरेस्ट नाही आहे.

कल्की कोएच्लिन : कल्की ने फिल्म डायरेक्टर अनुराग कश्यप सोबत 20011 साली लग्न केले होते जे नंतर 2015 पर्यंतच टिकू शकले. साल 2015 मध्ये यांचा घटस्फोट झाला. कल्की सध्या आपल्या करियर वर लक्ष देऊ इच्छिते ज्यामुळे लग्न तिची प्राथमिकता नाही आहे.