90 च्या दशका मध्ये बक्कळ पैसे घेत होते हे सात तारे, सनी देओल होता सगळ्यात महागडा कलाकार

0
15

बॉलिवूड मध्ये कलाकारांचे चित्रपट जसजसे सुपरहिट होतात तसे त्यांची चित्रपटा मध्ये काम करण्यासाठी घेत असलेले पैसे देखील वाढतात. आजकाल सेलेब्स प्रत्येक चित्रपटासाठी मोठमोठ्या रक्कमे सोबतच चित्रपटाला होणाऱ्या फायद्यात वाटा देखील मागतात. पण तुम्हाला माहीत आहे का 90 च्या दशकात बॉलिवूडचे स्टार किती पैसे घेत होते. या पोस्ट मध्ये दिलेले आकडे ‘बुक माय शो’ च्या एका रिपोर्ट प्रमाणे आहेत.

सलमान खान : बॉलिवूडचा सुलतान सलमान खान सध्या त्याची फिल्म दबंग 3 मुळे चर्चेत आहे. फिल्मचे पोस्टर, टीजर आणि ट्रेलर्स लोकांच्या पसंतीस येत आहेत. असे बोलले जाते कि या फिल्मसाठी सलमान खानला मोठी फी मिळाली आहे. तसे आजकालच नाही तर 90 च्या दशकात देखील सलमान खान मोठी फी घेत होता. रिपोर्ट्सच्या अनुसार त्यावेळी एक फिल्म करण्यासाठी सलमान खान 25 लाख रुपये फी घेत होता.

शाहरुख खान : फिल्म जीरो अपयशी झाल्या नंतर शाहरुख खान ने कोणत्याही फिल्म मध्ये काम नाही केले आहे. पण तरीही शाहरुख खानची मोठी फैन फॉलोईंग आहे. तसे तर शाहरुख खानचा चार्म आता थोडा कमी झाला असला तरी 90 च्या दशका मध्ये शाहरुख लोकप्रियतेच्या शिखरावर होता. रिपोर्ट अनुसार शाहरुख खान त्यावेळी एका फिल्मसाठी 35 लाख रुपये चार्ज करत होता.

सुनील शेट्टी : 90 च्या दशकात सुनील शेट्टी एक स्टार होता आणि आज देखील फिटनेसच्या बाबतीत कोणत्याही अभिनेत्याला टक्कर देऊ शकतो. रिपोर्ट अनुसार सुनील शेट्टी त्यावेळी एका फिल्मसाठी 20 लाख रुपये फी घेत होता.

अमीर खान : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट सध्या त्याची फिल्म लाल सिंह चड्डा मध्ये बीजी आहे. लाल सिंह चड्डा हॉलिवूड फिल्म फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. तर अमीरच्या फी बद्दल बोलायचे झाले तर रिपोर्ट अनुसार 90 च्या दशकात अमीर एका फिल्मसाठी 55 लाख रुपये चार्ज करत होता.

अक्षय कुमार : आता अक्षय कुमार एक हिट मशीन झाला आहे. अक्षय जवळपास प्रत्येक फिल्मसाठी आजकाल 100 करोडच्या क्लब मध्ये समाविष्ट होतेच. 90 च्या दशकात अक्षय कुमार रिपोर्ट अनुसार एका फिल्मसाठी 60 लाख रुपये चार्ज करत होता.

अजय देवगण : फुल और काटे सारख्या सुपरहिट फिल्म पासून आपल्या करिअरची सुरुवात करणारा अजय त्यावेळीही सुपरहिट होता आणि आता देखील सुपरहिट आहे. रिपोर्ट अनुसार 90 च्या दशकात अजय 65 लाख रुपये चार्ज करत होता.

सनी देओल : बॉलीवूडचा हा सुपरस्टार आता फिल्म मध्ये कमी आणि राजकारणात जास्त सक्रिय झाला आहे. पण 90 च्या दशकात सनीचे वर्चस्व होते. रिपोर्ट अनुसार सनी देओल ने फिल्म बॉर्डरसाठी 90 लाख रुपये फीस चार्ज केले होते.