People

मिडल क्लास वडिलांनी आपल्या मुलांसाठी बनवली खास ‘मिनी ऑटो’, कारण समजले तर डोळ्यात पाणी येईल

प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. ते आपल्या मुलांच्या सगळ्या लहानातील लहान इच्छा देखील पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. असे म्हणतात कि आई आपल्या मुलांवर सगळ्यात जास्त प्रेम करते आणि काहीही झाले तरी आपल्या मुलांचे दुःख पाहू शकत नाही. पण वडिलांच्या प्रेमाची काही सीमा नसते. भलेही वडील हे प्रेम कधी जाहीर करत नाहीत. वडील आपल्या कुटुंबाच्या सुख सोयी आणि आरामासाठी दिवसरात्र मेहनत करतात. आई आपले प्रेम मुलांच्या समोर जाहीर पणे दर्शवते पण पिता तसे करत नाही. वडील कुटुंबाचा पाया असतो. वडिलांची इच्छा असते आपल्या मुलांचा हट्ट पुरवावा भलेही त्यासाठी अधिक जास्त मेहनत करावी लागली तरी हरकत नाही. आज आम्ही या पोस्ट मधून अश्याच एका अश्या मिडल क्लास पित्याची गोष्ट सांगत आहोत ज्याने आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्यासाठी असे काम केले ज्यामुळे सगळे त्याची प्रसंशा करत आहेत.

मुलाचे स्वप्न पूर्ण केले

केरळ मध्ये राहणारे अरुण कुमार पुरुशोथमन यांनी असे काही केले कि जगभरात त्याची चर्चा होत आहे. खरंतर अरुण कुमार यांचा मुलगा माधवकृष्णा यास 1990 मधील रोमॅंटिक म्यूजिकल फिल्म ‘ए ऑटो’ अत्यंत आवडीची आहे. त्याची इच्छा होती कि त्याच्या जवळ एक अशी ऑटो रिक्षा असावी ज्यामध्ये बसून तो जेव्हा मनात येईल तेव्हा हिंडण्या-फिरण्यास जाऊ शकेल. त्याने आपल्या वडिलांना तसे अनेक वेळा बोलून देखील दाखवले. मुलगा आपल्या वडिलांना हे अगदी उत्साहात होऊन आपली इच्छा बोलून दाखवायचा. वडिलांच्या जेव्हा लक्षात आले कि मुलाची खरोखरच हि इच्छा आहे तेव्हा त्यांनी ही इच्छा पूर्ण करण्याचा विचार केला. अरुण कुमार आपल्या मुलांसाठी लाखो रुपयांची मोठी ऑटो रिक्षा देऊ शकत नव्हते कारण त्यांचा मुलगा अजून लहान होता. त्यांना माहीत होते कि त्याने फक्त चित्रपटा मध्ये पाहिले आहे आणि अजून त्याचे तेवढे वय नाही कि तो ऑटो चालवू शकेल. पण तरीही वडिलांनी त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले आणि एक उत्तम जुगाड केला.

बनवली एक ‘मिनी ऑटो’

मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अरुण ने स्वता एक छोटी ‘मिनी ऑटो’ बनवली. पण ही ऑटो रिक्षा फक्त खेळणे मात्र नाही तर एका रिक्षा प्रमाणे चालते आणि यांच्या आत मध्ये ते सगळे फंक्शन आहेत जे एका ऑटो रिक्षा मध्ये असतात. तुम्ही हा विचार करत असाल कि अरुण ने हे केले कसे? तर अरुणला वाहनांची आवड आहे. अरुणला देखील त्याच्या लहानपणी अश्या खेळण्यांची इच्छा होत असे पण त्याच्या वडिलांच्या गरीब परिस्थितीमुळे  त्यास असे मोठेमोठे खेळणी मिळत नव्हती. एकदा त्याच्या वडिलांनी त्यास लाकडी सायकल दिली त्यामधून प्रेरणा घेऊन त्याने अनेक लहान-लहान खेळणी बनवली. एवढेच नाही तर अरुणने 10 वी मध्ये JCB मशीनचे लहानसे वर्किंग मिनी मॉडेल बनवले होते. अरुण ने विचार केला जेव्हा तो घरीच स्वतः अश्या गाड्या आणि ऑटो बनवू शकतो तर मार्केट मध्ये हजारो रुपये खर्च करून टॉय घेण्याची गरज नाही.

खालील व्हिडीओ मध्ये पहा कशी आहे ही मिनी ऑटो

मित्रानो तुम्हाला कशी वाटली ही वडिलांनी आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत.

Tags
Show More

Related Articles

Back to top button