health

30 रुपये वाले तांदूळ असे बनवतात 100 रुपये वाले बासमती, काय तुम्हीपण खाताय का हे नकली बासमती

कोणत्याही विशेष प्रसंगी आपण बासमती तांदूळ खातो. त्याची बिर्याणी किंवा पुलाव करतो. पण कधी तुम्ही चेक केले आहे का की हे खरोखरच बासमती आहेत का नकली बासमती तांदूळ आहेत. कारण बाजारात 30 रुपयांना मिळणाऱ्या साध्या तांदळाला बासमती बनवून विकणारी टोळी सापडली आहे.

बिहारच्या भागलपूर मध्ये नकली बासमती तांदूळ बनवण्याचा अवैध्य कारोबार चालत असल्याचा खुलासा झाला आहे. येथील मिल मध्ये 30 रुपये किलोचा तांदूळ 100 रुपयात विकला जात आहे. पश्चिम बंगाल, गुजरात, दिल्ली आणि रांची येथील व्यापारी हे घेऊन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात सह पूर्ण भारतामध्ये सप्लाय करत आहेत.

असे बनवतात नकली बासमती तांदूळ

बासमतीचे दाने लांब असतात त्यासाठी लांब दाणे असलेल्या सामान्य तांदळाच्या जातींची निवड केली जाते. उदाहरणर्थी सौरभ सीता, डंकल आणि सीता सार इत्यादी.

धान कोमट पाण्याच्या टाकीमध्ये भिजवले जाते. या टाक्यांमध्ये सुगंधी पावडर मिक्स केली जाते. ओल्या धानला बॉयलर मध्ये टाकले जाते.

यानंतर तयार होणारा तांदूळ अगदी बासमती सारखा सुगंध देतो. त्यामुळे खऱ्या बासमती आणि नकली बासमती मध्ये फरक करणे सामान्य माणसासाठी कठीण होते.


Show More

Related Articles

Back to top button