astrology

जर तुम्ही पण पैसे दान देत असाल तर लक्षात ठेवा यागोष्टी, अन्यथा नाही होणार फायदा

दान केल्यामुळे अक्षय पुण्य मिळते आणि सोबतच जानतेअजानते पणी झालेल्या पापांच्या फळा पासून सुटका मिळते. शास्त्रामध्ये दान करण्यास विशेष महत्व दिले गेले आहे. हे पुण्य कर्म केल्यामुळे समाजात समानता निर्माण होण्यास मदत मिळते आणि गरजू लोकांना पण जीवन आवश्यक वस्तू मिळतात. येथे आपण पाहू दान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.

[lockercat]अन्न, जल, घोडा, गाय, वस्त्र, शय्या, छत्र आणि आसन या 8 वस्तूचे दान पूर्ण जीवन शुभ फल प्रदान करते. शास्त्रांची मान्यता आहे की आत्मा जेव्हा देह त्याग करतो तेव्हा आत्म्याला जीवनात केलेल्या पाप आणि पुण्याची फळे भोगावी लागतात. पाप कर्मांची भयानक फळे आत्म्याला भोगावी लागतात. या 8 वस्तूंचे दान मृत्यू नंतर मिळणाऱ्या या कष्टा पासून सुटका देतात.[/lockercat]

जो व्यक्ती पत्नी, पुत्र आणि परिवार यांना दुखी करत दान देतात, ते पुण्य देत नाही. दान हे सर्वाना आनंदी ठेवून केले पाहीजे.

गरजू व्यक्तीच्या घरी जाऊन केलेले दान उत्तम असते. गरजू व्यक्तीला घरी बोलावून दिलेले दान मध्यम असते.

जर एखादा व्यक्ती गायींना, ब्राम्हणांना आणि रुग्णांना दान करत असेल तर त्यास थांबवू नये. असे करणाऱ्या व्यक्तीस पाप लागते.

तीळ, जल आणि तांदूळ यांचे दान हातात घेऊन केले पाहिजे अन्यथा ते दान दैत्यांना प्राप्त होते.

दान करणाऱ्याचे मुख पूर्व दिशेला असावे आणि दान घेणाऱ्याचे मुख उत्तर दिशेला असावे. असे केल्यामुळे दान करणाऱ्याचे आयुष्य वाढते आणि दान घेणाऱ्याचे आयुष्य देखील कमी होत नाही.

पित्र देवतांना तिळाच्या सोबत आणि देवतांना तांदळा सोबत दान दिले पाहिजे.

व्यक्तीने चांगल्या मार्गाने कमावलेल्या धनाचा दहावा भाग शुभ कर्म करण्यासाठी खर्च केला पाहिजे. शुभ कर्म जसे गौशाळे मध्ये दान, गरजू लोकांना अन्नदान, गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी दान इत्यादी.

गोदान श्रेष्ठ मानले गेले आहे. जर तुम्ही गोदान करू शकत नसाल तर रुग्णांची सेवा करणे, देवतांचे पूजन करणे, ब्राम्हण आणि ज्ञानी लोकांची सेवा करणे हे तीन कर्म देखील गोदान करण्या समान पुण्य देणारे असतात.

दिन-हीन, आंधळे, निर्धन, अनाथ, मुके, विकलांग तसेच रुग्णांची सेवा करण्यासाठी जे धन दिले जाते त्याचे महान पुण्य प्राप्त होते.

जो ब्राम्हण विद्याहीन आहे त्याने दान घेतले नाही पाहिजे. जर विद्याहीन ब्राम्हण दान घेत असेल तर त्यास हानी होऊ शकते.

गाय, सोने, चांदी, रत्न, विद्या, तीळ, कन्या, हत्ती, घोडा, शय्या, वस्त्र, भूमी, अन्न, दुध, छत्र तसेच आवश्यक सामग्री सहीत घर या 16 वस्तूचे दान महादान मानले जाते. हे दान केल्यामुळे अक्षय पुण्य मिळण्य सोबत अनेक जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते.


Show More

Related Articles

Back to top button