Connect with us

या घरगुती फेसपॅकने उन्हाळयात तेलकट त्वचाही तजेलदार होईल

Health

या घरगुती फेसपॅकने उन्हाळयात तेलकट त्वचाही तजेलदार होईल

उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर सूर्यकिरणांमुळे आणि सतत येणार्‍या घामामुळे त्वचेवर तेल, मळ यामधून बॅक्टेरियांचा प्रसार वाढतो. त्यातही तेलकट त्वचा असणार्‍यांसाठी उन्हाळ्याचे दिवस फारच कठीण असतात. या दिवसात पिंपल्स, ब्लॅकहेडस, व्हाईटहेड्सचा त्रास अधिक जाणवतो. त्यामुळे त्वचा  स्वच्छ ठेवण्यासाठी सतत काळजी घेणे आवश्यक आहे. मग यासाठी महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स घेण्याआधी काही घरगुती आणि नैसर्गिक उपायांनीदेखील त्वचेचे आरोग्य खुलवणे शक्य आहे. हे ४ मसाल्याचे पदार्थ पिंपल्स ठरतील गुणकारी!

चंदन आणि मुलतानी मातीचा लेप उन्हाळ्यातील अनेक त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. मुलतानी माती त्वचा स्वच्छ करते तर चंदनामुळे थंडावा तयार होण्यास मदत होते. ‘चंदन आणि मुलतानी माती’च्या लेपाने उन्हाळ्याच्या दिवसातही चेहर्‍यावर कांती येण्यास मदत होते. मग पहा कसा बनवाल हा लेप ?

साहित्य आणि कृती  – :

एक टेबलस्पून मुलतानी मातीमध्ये चमचाभर चंदनाची पावडर किंवा चंदनाची काडी उगाळून एकत्र करा.

या मिश्रणामध्ये चिमूटभर हळद मिसळा.

या मिश्रणाची पेस्ट बनवण्यासाठी दूध किंवा गुलाबपाणी मिसळून हलकी पेस्ट बनवा. चेहर्‍यावर हलका थर पसरेल इतकेच पाणी यामध्ये मिसळा. अतिजाड किंवा अतिपातळ पेस्ट बनवू नका.

ब्रश किंवा हाताच्या सहाय्याने ही पेस्ट चेहर्‍यावर आणि मानेवर लावा.

10-20 मिनिटांनी चेहरा नैसर्गिकरित्या सुकल्यानंतर पाण्याने सवच्छ करा.

हा फेसपॅक काढताना हळूहळू पाण्याचा शिडकावा मारून हलक्या हाताने वर्तुळाकार दिशेने मसाज करा आणि चेहरा धुवा.

सुती कापडाने चेहरा हलकाच टिपून घ्या.

हा प्रयोग आठवड्यातून एकदा किंवा उन्हात फिरून घरी परतल्यावर रात्री करा. यामुळे त्वचेची कांती सुधारते.कोथिंंबीरच्या ‘या’ मास्कने आटोक्यात ठेवा उन्हाळ्यातील अनेक त्वचा समस्या

कसा ठरतो चंदन -मुलतानी मातीचा लेप फायदेशीर ?

मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते. तसेच घाण,मळ आणि मृत पेशींचा साचलेला थरदेखील दूर होण्यास मदत होते. चंदन त्वचेमध्ये थंडावा निर्माण करण्यासोबतच मॉईश्चराईझदेखील करण्यास मदत करते. यामुळे त्वचेवरील छिद्र बंद होण्यास मदत होते. चंदन हे नैसर्गिक टोनर असल्याने त्वचेवरील कांती सुधारण्यास मदत होते. तर हळद दाहशामक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल असल्याने त्वचेवरील बॅक्टेरियांचा नाश करण्यास मदत होते. त्वचा उजळण्यास मदत होते. यासोबतच दूध त्वचा मॉईश्चराईज आणि मुलायम करण्यास मदत करते. यामुळे टॅन, सनबर्न आणि पिगमेंटेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते.  उन्हाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top