lovePeople

विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील व्यभिचार कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान कलम 497बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय…

पुरुष आणि स्त्री दोन्ही समान आहेत. त्यामुळे विवाहबाह्य संबंधात पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही, असे सांगतानाच विवाहबाह्य संबंध (व्याभिचार) हा गुन्हा नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला…

कोर्ट काय म्हणाले?

व्यभिचार हा घटस्फोटासाठी कारण म्हणून गृहित धरता येईल, मात्र तो गुन्हा ठरत नाही…

व्याभिचार हा गुन्हा नाही. मात्र या कारणाने जर तुमच्या पार्टनरने आत्महत्या केली तर त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो….

काय आहे व्यभिचार कायदा?

व्यभिचार विषयक कायदा 157 वर्षांपूर्वी 1860मध्ये अस्तित्वात आला होता. या कायद्याअंतर्गत विवाहित पुरुष एखाद्या विवाहित महिलेशी तिच्या संमतीनं शारीरिक संबंध ठेवत असेल तर महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर पुरुषाला या कायद्याअंतर्गत गुन्हेगार मानले जाते.

गुन्हा सिद्ध झाल्यास पुरुषाला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. पण या कायद्यात एक पेच आहे. तो म्हणजे एखादा विवाहित पुरुष अविवाहित तरुणी किंवा विधवा महिलेशी संबंध ठेवत असेल तर त्याला या कायद्याअंतर्गत दोषी मानता येणार नाही.


Show More

Related Articles

Back to top button