health

डबल चिन (हनुवटीच्या खालचा भाग)कमी करण्यासाठी सोप्पे उपाय

बहुतेक वेळा वजन वाढल्यामुळे शरीरातील वेगवेगळ्या भागामध्ये फॅट साठते तशीच हनुवटीच्या खालील भागात देखील फॅट्स साठते यालाच ‘डबल चीन’ म्हणतात. आणि हे चेहऱ्यावर दिसायला वाईट दिसते या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी आम्ही काही सोप्पे उपाय सांगणार आहोत.

हसणे

हसण्याने चेहऱ्याची जास्तीची चरबी कमी केली जाऊ शकते. बनविले जाऊ शकते. हसण्याचा व्यायाम करताना पूर्ण हसावे पोजमध्ये घेऊन यावे. जितके शक्य असेन तितक्या प्रमाणात चेहऱ्याच्या मांसपेशींना ताण द्यावा.

चेहऱ्याचे व्यायाम

चेहऱ्याला सरळ ठेवावे. त्यानंतर जबड्याच्या खालच्या बाजूला जितके शक्य असेल तितके समोर आणावे. हनुवटीलाही समोर करावे. त्यानंतर पुन्हा आपल्या स्थितीत यावे.

जीभेचा व्यायाम

तोंड उघडून जितकी जास्तीत जास्त जीभ बाहेर काढता येईल तितकी काढावी. सुमारे दहा सेकंदापर्यंत हा व्यायाम करावा. योगाभ्यासात याला विशेष महत्व आहे.

च्युइंगम खाणे किंवा चावण्याची क्रिया

हा तसा इतका योग्य प्रकार नाही पण यामुळे अनेक जणांना फरक जाणवला आहे. चिशुगर फ्री च्युइंगम खाण्याने चेहऱ्याच्या मांसपेशांना व्यायाम मिळतो. परंतु यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे, यालाच पर्याय म्हणून चावण्यासारखी क्रिया केल्यास देखील सारखाच फायदा मिळतो

हे सोप्पे उपाय जर नियमित केल्यास तुम्हांला तुमची डबल चिन कमी करण्यास नक्की फायदा होईल


Show More

Related Articles

Back to top button