astrology

भाग्यशाली असतात ते पुरुष ज्यांच्या पत्नी मध्ये असतात हे चार गुण, सोबतच होते घरात खूप बरकत

हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना अतिक्षय खास महत्व आहे. हिंदू धर्मात महिलांना देवीचे स्थान दिले गेलेले आहे. पत्नीला अर्धांगिनी बोलले जाते म्हणजेच पतीचा अर्धा भाग. महाभारता मध्ये भीष्म पितामह यांनी सांगितले होते की कोणत्याही महिलेने नेहमी खुश राहीले पाहिजे. कारण त्यामुळेच घराची प्रगती आणि वंशवृद्धी होते. पत्नी खुश असल्यास घरामध्ये बरकत होते आणि घरामध्ये पैसा येत राहतो. याच्या विरुध्द ज्या घरामध्ये महिला दुखी राहतात तेथे नेहमी गरिबी असते. पत्नी मध्ये असलेल्या काही खास गुणांच्या मुळे तिला लक्ष्मी बोलले जाते.

हिंदू धर्मातील अनेक ग्रंथामध्ये पत्नीच्या गुणांच्या आणि अवगुणांच्या बाबतीत चर्चा केली गेलीली आहे. गरुड पुराणाच्या एका श्लोकात पत्नीच्या काही गुणांच्या बाबतीत सांगितले गेले आहे. यानुसार ज्या व्यक्तीच्या पत्नी मध्ये हे चार गुण असतात त्यांनी स्वताला नशीबवान समजले पाहिजे. पत्नीच्या अंगी असलेल्या गुणांच्या मुळेच घरामध्ये कधी पैश्यांची कमी राहत नाही आणि नेहमी सुख-शांती राहते.

सा भार्या या गृहे दक्षा सा भार्या या प्रियंवदा।

सा भार्या या पतिप्राणा सा भार्या या पतिव्रता।। (108/18)

याचा अर्थ जी पत्नी गृहकार्य दक्ष आहे, जी प्रियवादिनी आहे, जीचा पती तींचा प्राण आहे आणि जी पतीपरायणा आहे, वास्तव मध्ये तिच पत्नी आहे.

 

प्रत्येक पत्नी मध्ये असावेत हे चार गुण

गृहकार्य याचा अर्थ घरकाम असा आहे म्हणजे जी पत्नी भरातील कामे अर्थात भोजन बनवणे, साफसफाई करणे, घराची सजावट, कपडे आणि भांडी यांची सफाई, मुलांची देखभाल, घरी येणाऱ्या पाहुण्याचे स्वागत करणारी, कमी खर्चात उत्तम घर चालवणारी अश्या पत्नीला गृह्कार्य दक्ष असे बोले जाते. यागुणांच्या मुळेच पत्नी आपल्या पतीची प्रिय होते.

प्रत्येक पत्नीला आपल्या पती सोबत गोड स्वरात बोलले पाहिजे. अश्या पद्धतीने बोलल्यामुळे पती आपल्या पत्नीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतो आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पतीच्या सोबतच घरातील अन्य सदस्य जसे सासूसासरे, नणंद, दिर इत्यादी लोकांशी देखील प्रेमपूर्वक बोलले पाहिजे. आपल्या बोलण्याच्या पद्धतीनेच ती घरातील सदस्यांची लाडकी होते.

जी पत्नी आपल्या पतीलाच आपले सर्वस्व मानून त्याच्या सर्व आदेशांचे पालन करते, तिला धर्मशास्त्रा मध्ये पतीपरायण किंवा पतिव्रता बोलले जाते. पतिव्रता स्त्री नेहमी आपल्या पतीच्या आदेशाचे पालन करते आणि कधी ही त्याचे मन दुखवत नाही. पतीला दुखद गोष्ट सांगताना संयम ठेवून सांगते. अशी स्त्री आपल्या पती शिवाय अन्य कोणत्याही पुरुषा बद्दल विचार करत नाही.

एका पत्नीसाठी सर्वात मोठा धर्म हा असतो की ती आपल्या पती आणि परिवाराची भलाई करेल आणि चुकूनही असे कार्य करणार नाही ज्यामुळे सर्वांचे मन दुखावल्या जाईल. गरुड पुराणाच्या अनुसार जी पत्नी दररोज स्नान करून आपल्या पतीसाठी साजशृंगार करते, कमी बोलते तसेच सर्व शुभ चिन्हाने युक्त असेल. जी नेहमी धर्माचे पालन करेल आणि आपल्या पतीचे हित करेल तिलाच खऱ्या अर्थाने पत्नी मानले पाहिजे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : हेडफोन वर लिहिलेले “R” आणि “L” चा अर्थ Right आणि Left नाही.. तर हा असतो खरा अर्थ


Show More

Related Articles

Back to top button