प्रत्येक आईने आपल्या मुलीला शिकवले पाहिजेत हे 10 गुण, सुधारेल तिचे आयुष्य

मुली लक्ष्मीचे रूप असतात हे सगळ्यांनीच ऐकले असेल. असे असलं तरी मुलीला समाजा मध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तिला ते ऐशो आराम किंवा सुख-सुविधा किंवा स्वातंत्र्य नाही मिळत जे एका मुलाला मिळते. हा समाज अजूनही एक पुरुष प्रधान समाज आहे. तरीही आपल्या नवीन जनरेशनला आपण याचा प्रतिकार करणे आणि पुढे जाण्यासाठी तयार केले पाहिजे. याची सुरुवात आपण आपल्या घरातून करावी. आपल्या मुलीला काही असे शिक्षण आणि गुण लहानपणी शिकवले पाहिजेत ज्यामुळे भविष्यात ते आपले नाव कमावेल आणि स्वताला एक चांगले आयुष्य देऊ शकेल. तर चला जाणून घेऊ आपण आपल्या मुलीला काय काय सांगितलं पाहिजे.

मुली तू आमच्या मुला पेक्षा कमी नाही आहेस. तू देखील आयुष्यात ते सगळं करू शकतेस जे एक मुलगा करतो. त्यामुळे कधीही आपल्या स्वप्नांना यासाठी मोडू नकोस कि तू एक मुलगी आहेस आणि हे एखादे विशष काम तू करू शकणार नाहीस.

नेहमी स्वतावर विश्वास ठेव. हे जग तुझ्या बद्दल काहीही बोललं तरी तू आपली हिम्मत हारु नकोस. या जगामध्ये काहीही अशक्य नाही आहे.

या जगामध्ये शिक्षण हे सगळ्यात मोठे हत्यार आहे. त्यामुळे खूप मन लावून अभ्यास कर. नॉलेजच्या बळावर तू कोणत्याही अशक्य गोष्टीला शक्य करू शकतेस. त्यामुळे कधीही आपल्या शिक्षणा सोबत तडजोड करू नकोस.

या जगामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही लोक राहतात. वाईट लोकांपासून दूर राहा, चांगल्याची साथ दे. जर कोणीही तुझ्या सोबत वाईट केले तर त्याला उत्तर दे जेणेकरून तो पुन्हा दुसऱ्या कोणत्याही मुलीला त्रास देऊ शकणार नाही.

तुला फिजिकली फिट राहील पाहिजे. पाहिजे तर कराटे क्लास जॉईन कर. आपलं स्वसंरक्षण करता आलं पाहिजे. विशेषतः तेव्हा जेव्हा एखादा मुलगा तुझी छेड काढेल किंवा वाईट काम करेल.

आयुष्यात कुटुंब आणि करियर दोघांचं आपलं वेगळं महत्व आहे. नेहमी एक रस्ता असा आवश्य असतो ज्यामुळे दोन्हीवर फोकस करता येऊ शकते. त्यामुळे यापैकी कोणत्याही एका सोबत तडजोड करू नकोस.

आम्ही तुझ्या सोबत कधीही भेदभाव करणार नाही. जी सुविधा मुलाला मिळेल ती तुला देखील मिळेल. जी बंधने मुलावर असतील ती तुझ्यावर देखील असतील.

तू आमचा गर्व आहेस. तू आमचा अभिमान आहेस. त्यामुळे आयुष्यात कधी कोणाही सोबत चुकीचं किंवा वाईट करू नकोस. नेहमी माणुसकी आणि खरेपणा सोबत राहा. तुझ्या कर्मानेच आमची इज्जत वाढणार आहे. त्यामुळे निर्णय विचार पूर्वक घ्या.

तुझ्यासाठी आमच्या घराचे आणि मनाचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. जर आयुष्यात काही चूक झाली तर त्वरित आम्हाला सांग. चुकीला मुळीच लपवू नकोस किंवा यास झाकण्याच्या प्रयत्नात अजून चुका करू नकोस.

या समाजा मध्ये काही असेही लोक भेटतील जे तुला मागे ओढतील, तुझा वाईट वापर करू इच्छीतील, तुला पुढे जाण्यापासून अडववतील पण तुला त्यांना असे करू द्यायचे नाही आहे. स्वताला पुढे घेऊ जायचे आहे. आपला हक्क सोडायचा नाही आहे.