money

Event Blogging काय असते – इव्हेंट ब्लॉगिंग करून पैसे कसे कमवावे – भाग 1

इंटरनेटवर फक्त फेसबुक आणि व्होट्सअप वापरणाऱ्या माझ्या मित्रांनो यापुढे ही विचार करायला शिका. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण आज असे अनेक उदाहरणे आहे की जे फक्त इंटरनेटवर आपला थोडासा वेळ गुंतवून महिना लाखो रुपये कमवत आहेत. यासाठी तुम्हाला लोक तंत्रज्ञान वापरून आपले उद्योग कसे सुरु करत आहेत आणि पुढे घेऊन जात आहेत हे शिकले पाहिजे. चला इंटरनेट वरील अनेक संधी पैकी एक असलेल्या इव्हेंट ब्लॉगिंग या संधी बद्दल बोलूया.

इव्हेंट ब्लॉगिंगचा अर्थ असा आहे की जेवढे पैसे सामान्य वेबसाईट किंवा ब्लॉगर 2-3 महिन्यात कमावतो तेवढे पैसे 2-3 दिवसात कमवणे. कदाचित हे तुम्हाला खोटे वाटत असेल किंवा आम्ही तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करत आहोत असे वाटत असेल पण असे करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही आणि असे केल्यामुळे आम्हाला काही फायदा होणार आहे असेही नाही. तर आम्हाला वाटते मराठी समाज या क्षेत्रात मागे रहात आहे तर हिंदी भाषिक लोक याक्षेत्रात आपले स्थान पक्के करत आहेत यासाठी हा खटाटोप.

इव्हेंट ब्लॉगिंग एक अशी पद्धत आहे ज्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त पैसे कमवले जाऊ शकतात. जर तुम्ही यशस्वी झालात तर 2-3 दिवसात चांगली कमाई होईल. जर तुम्हाला पैसे कमावण्यासाठी ब्लॉगिंग करायची असेल तर इव्हेंट ब्लॉगिंग हा उत्तम पर्याय आहे. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला इव्हेंट ब्लॉगिंग बद्दल स्टेप बाय स्टेप माहीती देत आहोत. हे आपण 3 टप्प्यात पाहू ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजेल. चला तर सुरु करू इव्हेंट ब्लॉगिंगची माहीती.

इव्हेंट ब्लॉगिंगचा अर्थ असतो एखाद्या विशेष इव्हेंटला टार्गेट करणे आणि त्या दरम्यान जास्तीत जास्त पैसे कमवणे. उदाहरणार्थ: दिवाळी, न्यु इयर, ईद किंवा व्हेलेंटाईन डे इत्यादी.

खरेतर इव्हेंट ब्लॉगिंग 30-40 दिवस केली जाते आणि त्या दरम्यान भरपूर लोकांना आपल्या वेबसाईटचा वापर करवून जास्तीत जास्त पैसे कमवणे हा उद्देश असतो. येणाऱ्या इवेन्ट संबंधीचे प्रोडक्टचे प्रमोशन किंवा सेल करून पैसे कमावता येतात.

तुम्हाला इव्हेंट ब्लोगिग बद्दल माहीत पाहिजे असेल तर खालील बॉक्स मधून पेज लाईक करा. जर इव्हेंट ब्लॉगिंग बद्दलची माहीती तुमच्या रिस्पोन्स पाहून पुढे देण्यात येईल जर रिस्पोन्स नसेल तर उगाच आम्ही माहीती देण्यात वेळ का वाया घालवावा. तर कृपया जर पुढील माहीती हवी असेल तर आजच पेज लाईक करा.


Show More

Related Articles

Back to top button