Virat Kohli Mumbai Home: भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराट कोहलीने नुकताच कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तेव्हापासून तो चांगलाच चर्चेत आहे. पण आज या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला विराटच्या करिअरची नाही तर त्याच्या लग्झरी लाईफची ओळख करून देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला विराटच्या मुंबईतील आलिशान घराचा प्रत्येक कोपरा दाखवणार आहोत. जिथे तो पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत राहतो. टीम इंडियाचा स्टार फलंदाज कोहलीचे आलिशान घर कसे आहे ते पाहूया…
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईत सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहतात. जे 35 व्या मजल्यावर आहे. लग्नानंतर विराट आणि अनुष्का या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते.
विरुष्का हे आलिशान घर मुंबईतील ओंकार-1973 इमारतीत बनवले आहे. हा फ्लॅट 7,171 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे.
विराट कोहली-अनुष्का शर्माच्या या लक्झरी फ्लॅटमध्ये 5 बेडरूम आहेत. फ्लॅटची प्रत्येक बेडरूम आणि लिव्हिंग रूम समुद्राचे अतिशय सुंदर दृश्य देते.
विरुष्काच्या या फ्लॅटची किंमत जवळपास 34 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. विराटच्या घरात आधुनिक फर्निचर बसवण्यात आले असून भिंतींना पांढरा रंग देण्यात आला आहे. जे घराच्या सौंदर्यात भर घालत आहे.
कोहली आणि अनुष्काच्या घरात एक खूप मोठी आणि सुंदर बाल्कनी आहे, जिथे मुंबईचे खूप सुंदर दृश्य दिसते. विरुष्काच्या घरात वुडन फ्लोअरिंग करण्यात आले असून संपूर्ण घर लाकडी फर्निचरने सजवण्यात आले आहे.