Breaking News

Shah Rukh Khan | बॉलिवूड करिअरला 30 वर्ष पूर्ण, शाहरुख खान ने चाहत्यांसाठी शेअर केली भावनिक पोस्ट!

मुंबई : शाहरुख खान चा ‘दीवाना’ चित्रपट 25 जून 1992 रोजी प्रदर्शित झाला होता. ‘दीवाना’ चित्रपटामधून शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. शाहरुख खान सोबत या चित्रपटामध्ये ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) मुख्य कलाकार होते.

चित्रपटामध्ये येण्या अगोदर शाहरुख खान ने टीव्ही सिरीयल मध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती त्यानंतर त्याने बॉलिवूड मध्ये पाऊल ठेवलं. त्याला ‘दीवाना’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि नंतर एकामागे एक हिट चित्रपटाने शाहरुख खानला बॉलिवूडचा ‘बादशहा’ बनवलं. बॉलिवूड मध्ये आपल्या कारकिर्दीला 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता शाहरुख खान ने आपल्या चाहत्यांना खास संदेश लिहिला होता. (Shah Rukh Khan completes 30 years in Bollywood film industry).

शाहरुख खानची पोस्ट

शाहरुख ने आपल्या संदेशात लिहिले ‘तुमचे प्रेम 30 वर्षांपासून मिळत आहे आणि आजही तुमचे ही प्रेम अबाधित आहे. माझ्या आयुष्याच्या अर्ध्याहून अधिक काळ मी तुम्हा सर्वांचे मनोरंजन केले आहे, हे आज लक्षात आले. मी वेळात वेळ काढून सर्वांचे आभार मानणार आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमाची अत्यंत गरज आहे…’

शाहरुख खान चित्रपटात शेवटी ‘झिरो’ मध्ये दिसला

शाहरुख खान 2018 मध्ये ‘झिरो’ चित्रपटात शेवटी दिसला होता. ‘झिरो’ मध्ये शाहरुख खान सोबत मुख्य भूमिकेत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ होत्या. परंतु जबरदस्त स्टारकास्ट असून देखील चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. ज्यानंतर शाहरुख खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही.

‘पठाण’ चित्रपटात दिसणार शाहरुख खान

शाहरुख खान लवकरच ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा फस्ट लूक लवकरच शेअर करणार आहे. शाहरुख खान सोबत या चित्रपटात जॉन अब्राहाम आणि दीपिका पदुकोण असणार आहे. शाहरुख सोबत खलनायक म्हणून जॉन अब्राहम या चित्रपटात भिडणार आहे.

(Shah Rukh Khan completes 30 years in Bollywood film industry).

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.