बॉलिवूड अभिनेता आणि छोटा नवाब सैफ अली खान (Saif Ali Khan). सैफने आपल्या कारकिर्दीत अनेक शानदार चित्रपटांमध्येही काम केले आहे. सैफ पतौडी कुटुंबातील आहे आणि त्यामुळेच तो चाहत्यांच्या हृदयावर तसेच करोडोंच्या मालमत्तेवरही राज्य करतो. आज आम्ही तुम्हाला सैफच्या पतौडी येथील आलिशान बंगल्याची छायाचित्रे दाखवणार आहोत.
सैफ अली खान अनेकदा पत्नी करीना कपूर खानसोबत हरियाणातील पतौडी पॅलेसमध्ये जात असतो.
हा महाल 10 एकर पेक्षा जास्त जागेवर पसरलेला आहे, ज्यामध्ये 150 हून अधिक खोल्या आहेत.
या राजवाड्याचे आतील भागही अतिशय आलिशान पद्धतीने तयार करण्यात आले आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, या पॅलेसची किंमत 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पतौडी कुटुंबाकडेही संपत्तीची कमतरता नाही. त्यांच्याकडे 2700 कोटींहून अधिक संपत्ती आहे.
सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्या निधनानंतर, हा पॅलेस नीमराना हॉटेल्सला देण्यात आला, ज्यांनी 2014 पर्यंत लक्झरी मालमत्ता म्हणून ते चालवले.
टायगर पतौडीच्या मृत्यूनंतर सैफची आई शर्मिला त्याची काळजी घेत असे. पण आता त्याचा मुलगा सैफ अली खान करतो.
या घराचे आतील भाग खूपच आलिशान आहे. या महालाची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
सैफचे कुटुंबीय येथे अनेकदा येतात.वडील मन्सूर अली खान यांच्या निधनानंतर सैफला पतौडीचा नवाब घोषित करण्यात आले.