राधिका मूळची पिथमपुरा, दिल्लीची आहे, पण तिला अभिनयात करिअर करायचे होते, म्हणून ती मुंबईत राहायला गेली. पण मुंबईत येऊन चित्रपटात करिअर करण्याआधी ती दिल्लीत डान्स इन्स्ट्रक्टर म्हणून काम करायची आणि डान्स शिकवायची.

तिला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती त्यामुळे ती मुंबईत आली.

एका मुलाखतीदरम्यान राधिकाने सांगितले होते की, करीना कपूर आणि शाहिद कपूर स्टारर ‘जब वी मेट’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये तिला करिनाची भूमिका करायची आहे.