Breaking News
Home / एंटरटेनमेंट / सोशल मीडियावर फेमस असलेल्या या चेहऱ्या बद्दल प्रत्येक गोष्ट तुम्हाला तोंडात बोट घालायला लावेल

सोशल मीडियावर फेमस असलेल्या या चेहऱ्या बद्दल प्रत्येक गोष्ट तुम्हाला तोंडात बोट घालायला लावेल

मित्रांनो आज आपण सोशल मीडियावर आणि विशेषतः मिम्स द्वारे फेमस असलेल्या Paw Paw म्हणजेच Osita Iheme बद्दल जाणून घेणार आहोत. याला कलाकाराचे नाव तुम्हाला माहीत नसेल परंतु मिम्स मधून तुम्ही याला नक्कीच पाहिलं असेल.

या कलाकाराचे नाव आहे Osita Iheme याला Paw Paw म्हणून देखील ओळखतात. कदाचित तुम्हाला हा एक लहान मुलगा वाटत असेल पण याच खरं वय 39 वर्ष आहे. काय वाचून धक्का बसलाना पण मित्रांनो हे खरं आहे त्याच वय 39 आहे. हाइट कमी असल्यामुळे तो आपल्याला लहान मुलगा वाटतो.

हा एक Nigerian Actor आहे. याचा जन्म 20 फेब्रुवारी 1982 रोजी Mbatoli Nigeria मध्ये झाला. याचा जन्म येथील एका गरीब कुटुंबात झाला होता.

Paw Paw ने आपले लहानपणी चे शिक्षण IMO State Nigeria येथून केलं. त्यानंतर पुढील शिक्षण B.Sc Computer Science केलं. त्याला लहानपणा पासून फुटबॉल प्लेयर बनायचं होत. पण पुढे जाऊन त्यांचे स्वप्न एक्टिंग झाले.

Osita iheme च्या करियर ची सुरुवात एक्टिंगसाठी ऑडिशन देऊन केली ज्यानंतर त्यास 2003 मध्ये एका फिल्म मध्ये काम करण्याची संधी भेटली ज्याचे नाव AKI NA UKWA  होत.

या फिल्म मध्ये त्याने एका लहान मुलाचा रोल केला होता ज्याचं नाव पाव पाव होत. आणि या फिल्म नंतर तो लोकांमध्ये खूप फेमस झाला होता.

ओसीता 2002-03 पासून फिल्म मध्ये काम करत आहे. आपण जे व्हिडीओ पाहतो ते खरंतर 17 वर्षा पूर्वीचे व्हिडीओज आहेत.

Osita Iheme चे लग्न देखील झाले आहे त्याच्या पत्नीच नाव रोमा आहे आणि त्यांचा एक मुलगा देखील आहे. ओसीटा पत्नी सोबत खालील फोटो मध्ये पाहू शकता.

खरंतर Osita ला फेमस करण्याचं श्रेय जात निकोल नावाच्या एका मुलीला निकोल ब्राजील मध्ये राहते. निकोल ने Osita ची एक फिल्म पाहिली आणि तिला फिल्म एवढी आवडली की तिने ट्विटर वर Nohllywood Troll नावाने एक पेज बनवलं आणि त्यामध्ये ओसीटा च्या मुव्हीजच्या क्लिप्स शेअर करू लागली. हळूहळू या पोस्ट वर व्ह्यूज वाढत गेले आणि ओसीटा सोशल मीडियावर वायरल झाला.

मित्रांनो तुम्हाला वरील माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांच्या सोबत शेअर करा आणि आम्हाला प्रतिक्रिया द्या.

About AMIT GHANASHYAM VELEKAR

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.