MS Dhoni Plays Golf With Donald Trump : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) मध्ये त्याच्या सुट्टीचा आनंद घेत आहे.
6 सप्टेंबर रोजी, धोनीने US ओपन 2023 पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील कार्लोस अल्काराझ आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यातील आर्थर अॅशे स्टेडियमवर झालेल्या टेनिस सामन्याला हजेरी लावली. यावेळी खेळाडूंच्या बसण्याच्या जागेच्या मागे बसून आणि टेनिसच्या चांगल्या खेळाचा आनंद घेत असलेला एमएसडीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
वृत्तानुसार, ट्रम्प यांनी धोनीला गोल्फ खेळासाठी आमंत्रित केले होते . धोनी सुट्टीसाठी अमेरिकेत असल्याची माहिती आहे. या फोटोवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत आणि ‘अमेरिकेतही थाला फिव्हर आलाय’ असं म्हणत आहेत.
MS Dhoni playing golf with Donald Trump.
– The craze for Dhoni is huge. pic.twitter.com/fyxCo3lhAQ
— Johns. (@CricCrazyJohns) September 8, 2023
ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळतानाचा एक व्हिडिओ आणि गोल्फ गियरमध्ये त्यांच्यासोबत क्लिक केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल फोटोमध्ये धोनी आणि ट्रम्प एकमेकांच्या शेजारी उभे आहेत, इतर तिघेही कॅमेऱ्यासाठी पोज देत आहेत.