Sayli Patil : नवीन अभिनेत्री सायली पाटील (sayli patil) झुंड या हिंदी चित्रपटा मध्ये ‘भावना भाभी’ च्या भूमिकेत दिसली होती. तेव्हा पासूनच तिने लोकांना तिच्या सौंदर्याने प्रभावित केले आहे.
महाराष्ट्राची क्रश म्हणून सायली पाटील ओळखली जाऊ लागली आहे.
झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या सोबत अनेक नवोदित कलाकारांनी पदार्पण केले होते त्यापैकी एक सायली पाटील (sayli patil) होती.
सायली पाटील (Sayli Patil)चा जन्म 6 ऑगस्ट १९९३ ला ठाण्यात झालेला असून, ठाण्यातच तिने शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतले.
महाराष्ट्र टाइम्स तर्फे होणाऱ्या, ‘श्रावण क्विन’ या स्पर्धेत सायली पाटील Runnerup म्हणून निवडून आली होती.
सायलीला अभिनया बरोबरच नृत्याची आवड आहे. तिने भरत नाट्यमचे शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर तिला कथ्थक आणि इतर नृत्याचे प्रकार करण्याची आवड आहे.
महेश कोठारे या मोठया बॅनर खाली तयार झालेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेतून तिने अभिनेत्री म्हणून सायली पाटील ने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘Boyz 2’ या चित्रपटात तिने चित्रा नावाच्या मुलीचे काम केले आहे.
सर्व फोटो सौजन्य : सायली पाटील (Instagram)