गौरव मोरे झाला भावुक… घरात आणि चाळीतही लंडनला जाणारा मी पहिलाच…

Gaurav More Foreign Trip : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक हरहुन्नरी कलाकार आपल्या जबरदस्त विनोदी शैलीनं प्रेक्षकांना हसवत आहेत. गौरव मोरे हे त्यापैकीच एक नाव. हा कलाकार सध्या प्रेक्षकांचा लाडका ठरला आहे.

पवई फिल्टरपाडामध्ये राहणाऱ्या गौरवची सुरुवात त्याचा मित्र तुषार पवार याच्या सोबतीनं झाली. एकांकिकांमधून तो काम करायचा. एस के सोमय्या कॉलेजमध्ये असताना, एकपात्री स्पर्धा बघून त्याची सुरुवात झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

‘जळू बाई हळू’ या नाटकात अभिनेता आनंदा कारेकरचा बदली कलाकार म्हणून तो काम करत होता. या नाटकात काम सुरू असतानाच प्रसाद खांडेकर यांच्या ‘पडद्याआड’ या एकांकिकेसाठी गौरव काम करू लागला आणि याच एकांकिकेमुळे त्याला नवी ओळख मिळाली.

प्रसाद खांडेकरशी झालेल्या मैत्रीमुळे पुढे प्रसादनं लिहिलेल्या नाटकात आणि स्किटमध्ये गौरव (Gaurav More) काम करू लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून त्यानं मालिकाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तो विनोदी भूमिका करत होता.

‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ असं म्हणत घराघरात पोहोचलेला अभिनेता आणि कॉमेडियन गौरव मोरे याने काही दिवसांपूर्वी लंडनवारी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Pawar (@madhuripawarofficial)

गौरवची ही पहिलीच परदेशवारी आहे. याबद्दल तो प्रचंड खूष आहे.त्याला या गोष्टीची प्रचंड अभिमान आहे, की तो त्याच्या घरातला आण चाळीतला लंडनला आलेला पहिला व्यक्ती आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

मी कामासाठी लंडनला आलोय. मी फक्त चित्रपट आणि सीरिजमध्ये लंडन पाहिलं होतं. इथं आल्यानंतर मला स्वत:लाच विश्वास बसत नव्हता. असं तो म्हणतो.

सर्व फोटो सौजन्य : गौरव मोरे (Gaurav More Instagram)

Follow us on

Sharing Is Caring: