स्वामी समर्थ यांच्या अवतार कार्यावर आधारित जय जय स्वामी समर्थ ही मालिका लोकांच्या पसंतीस पडत आहे. मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
ही मालिका सुरु झाल्यापासून यात स्वामींची भूमिका साकारणारा अभिनेता नेमका आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
View this post on Instagram
आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि या मालिकेत अक्षय मुदवाडकर या अभिनेत्याने स्वामींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
लहानपणापासून अभिनयाची आवड असणारा अक्षय मूळचा नाशिकचा आहे. या मालिकेव्यतिरिक्त त्याने अनेक प्रायोगिक, व्यावसायिक नाटकं केली आहेत.
View this post on Instagram
‘गांधी हत्या आणि मी’,’ द लास्ट व्हॉइसरॉय’ या नाटकात त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेतही अक्षय झळकला आहे.
अक्षयचं एक युट्यूब चॅनेल आहे ज्यामध्ये अक्षय आपले अनुभव शेअर करत असतो.
View this post on Instagram
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेला अक्षय अनेकदा त्याचे मित्रपरिवार, कुटुंबीय यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असतो.