जय जय स्वामी समर्थ ही कलर्स मराठी वरील मालिका तुफान लोकप्रिय झाली आहे. यामधील कलाकारांच्या भूमिका लोकांच्या पसंतीस पडत आहे. लोकांच्या प्रतिसादाने आणि प्रेम पाहून कलाकार आनंदित आहेत.
या मालिकेत राधा अक्काची भूमिका करणारी अभिनेत्री नीता पेंडसे (Neeta Pendse) यांना देखील प्रेक्षकांच्या प्रेमाचा अनुभव आलेला आहे.

नीता पेंडसे यांनी पूर्वी नाट्यसृष्टी मध्ये काम केले आहे. त्यांनी प्रशांत दामले यांच्या गेला माधव कुणीकडे, एका लग्नाची गोष्ट इत्यादी मध्ये काम केले आहे.
राधाक्काची ही व्यक्तिरेखा सुरुवातीच्या काळात स्वामींचा थोडा राग करत होती परंतु नंतर स्वामींची भक्त झाल्याचे दिसून आले.
राधा अक्का यांचे ‘तर तर’ बोलणे किंवा ‘शिव हरी’ बोलणे लोकांना आवडते.
जय जय स्वामी समर्थ या मालिकेचे 400 पेक्षा जास्त एपिसोड झालेले आहेत.
सर्व फोटो सौजन्य : नीता पेंडसे (Instagram)