‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत सुंदराबाईचा अभिनय करणारी अभिनेत्री संजय दत्त सोबत ‘या’ चित्रपटात झळकली होती

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांना आवडते मंग ती व्यक्तिरेखा कोणतीही असो. प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांवर जादू केली आहे.

याच मालिकेत सुंदराबाई काडगावकर यांची व्यक्तिरेखा स्वामींवर आपला अधिकार दाखवणारी आहे आणि अनेक चुका करून देखील सुंदराबाईची पूर्वपुण्याईमुळे स्वामी तिला नेहमी क्षमा करताना दिसले आहेत.

माधवी सोमण यांचा परिवार

याच सुंदराबाईंची भूमिका माधवी सोमण यांनी केली आहे. यापूर्वी आपण त्यांना अनेक मालिका आणि चित्रपटात पाहिले आहे.

विठू माऊली या मालिकेत देखील माधवी सोमण यांनी पुंडलिकाच्या आईची म्हणजेच सत्यवतीची भूमिका केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhavi Soman (@madhavisoman)

माधवी सोमण यांनी आता पर्यंत पिंपळपान. अवघाची संसार, आपली माणसं, वादळवाट, सोनियाचा उंबरठा, उंच माझा झोका, घाटगे ऍन्ड सून, विठू माऊली अशा अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.

मुन्नाभाई एम.बी.बी.एस मध्ये असाच ठसा उमटविणारे एक दृष्य आहे. संजय दत्त आणि एक वृद्ध सफाई कामगार यांच्यात तणाव निर्माण होणार इतक्यात संजय त्याला जादू कि झप्पी देतो त्यानंतर जी नर्स स्मितहास्य करते ती माधवी सोमण आहे.

माधवीने माधुरी दीक्षित प्रॉडक्शन हाऊसच्या १५ ऑगस्ट ह्या चित्रपटात काम केले. हा चित्रपट नेटफ्लिसवर आहे. तसेच सर्व लाईन्स व्यस्त आहेत, ट्रिपल सीट, मिशन चॅम्पियन, मायबाप, विठ्ठल विठ्ठल, मुन्नाभाई एम.बी.बी.एस ह्या चित्रपटातही ती दिसली.

सर्व फोटो : माधवी सोमण (Instagram)

Follow us on

Sharing Is Caring: