Jarvo 69: भारताचा क्रिकेट सामना सुरु असताना मैदानात येणारा ‘Jarvo 69‘ तुम्ही पाहिला असेलच, तो इंग्लंड मधील तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील मैदानात घुसला होता आणि आता वन डे वल्डकपच्या भारताच्या पहिल्या सामन्यात देखील याने मैदानात घुसखोरी केली.
त्यामुळे सर्वाना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की हा जार्वो 69 आहे तरी कोण आणि का नेहमी मैदानात घुसखोरी करतो. भारतीय टिमचा ड्रेस परिधान करून ग्राउंड मध्ये येणारा हा जार्वो 69 भारतीय क्रिकेटपटू नाही किंवा त्याचा क्रिकेटशी कोणताही प्रकारचा संबंध नाही. तो एक सिरीयल प्रँकस्टर (युटूबर) आहे, जो इंग्लंडमधील केंट काउंटीच्या ग्रेव्हसेंड शहराचा रहिवासी आहे.
‘जार्वो 69’ याचे खरे नाव ‘डॅनियल जार्विस’ पण त्याच्या खऱ्या नावाने क्वचितच कोणी ओळखत असेल. इंग्लंड मधील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारतीय क्षेत्ररक्षक म्हणून प्रवेश केल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या भारतीय जर्सीचे नाव ‘जार्वो 69’ असे होते. पण ओळख पटल्यानंतर सुरक्षा कर्मचार्यांनी जार्विसला तत्काळ ग्राउंड मधून बाहेर काढले.
एका ट्विटमध्ये, प्रँकस्टारने पुष्टी केली, “होय, मी जार्वो आहे , जो खेळपट्टीवर गेला होता. भारताकडून खेळणारा पहिला गोरा माणूस असल्याचा मला अभिमान आहे.” यादरम्यान डॅनियल जार्विस भारतीय जर्सीसोबत पोज देताना दिसला.
डॅनियल जार्विस उर्फ ‘जार्वो 69’ एक युट्युबर आहे आणि प्रसिद्धीसाठी हे सर्व करतो असे मानण्यात येत आहे. इंडियाची क्रिकेट मैच असल्यास तेथे गर्दी जास्त असते आणि इंडिया मध्ये मोठ्या प्रमाण युट्युब पाहिले जाते त्यामुळे तो प्रसिद्धीसाठी हे करतो.
यामुळे मात्र मैच दरम्यान असलेल्या कमकुवत सिक्युरिटीची पोलखोल मात्र नक्की होत आहे. ज्या प्रकारे हा एक सामान्य व्यक्ती थेट मैदानात घुसत आहे त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षे बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते.