मुंबई : राधा कृष्ण ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांवर आपली छाप सोडली आहे. या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. पण या मालिकेतील राधा उर्फ ​​मल्लिका सिंह खऱ्या आयुष्यात कशी दिसते हे चाहत्यांना माहीत आहे का? नाही, तर चला पाहूया.

राधा कृष्ण मालिका 2018 मध्ये प्रसारित झाली होती. या मालिकेत राधा आणि कृष्णाच्या प्रेमाची आणि त्यांच्या बलिदानाची कथा दाखवण्यात आली होती. या मालिकेत सुमेध मुदगलकरने कृष्णाची तर मल्लिका सिंगने राधाची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना ही मालिका इतकी आवडली की या मालिकेला खूप टीआरपी मिळाला. मालिकेतील गाणी तसंच कथा आणि पात्रंही चमकदार होती.

राधाची भूमिका साकारणाऱ्या मल्लिका सिंगला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. पण पारंपरिक पोशाखात दिसणारी राधा म्हणजेच मल्लिका सिंह खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक स्टायलिश फोटो आहेत. हे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. कधी ती क्रॉप टॉप घातलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते तर कधी ती स्कर्ट टॉपमध्ये दिसते. तिचा हा फॅशनेबल अवतार पाहून चाहतेही वेडे झाले आहेत.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत?

या अवतारात तुम्हाला ओळखणे खूप अवघड आहे, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. बॉलीवूडला फेल करशील, अशी प्रतिक्रिया आणखी एका चाहत्याने दिली. तिचे चाहते फोटोवर कमेंट करत आहेत.

मल्लिका सिंगने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘जय कन्हैया लाल की’, ‘ए सुटेबल बॉय’, ‘जानबाज सिंदबाद’ यांसारख्या अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये ती दिसली आहे. त्याचवेळी चाहत्यांना तिला पुन्हा एकदा राधाच्या रुपात पाहायचे आहे.