धर्मेंद्रने बहिणीसाठी सोडला ‘जंजीर’, चित्रपट निर्मात्याने केले असे काही की बदल्यात घ्यावा लागला दुसरा चित्रपट

Dharmendra: धर्मेंद्र (Dharmendra) यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. परंतु फार कमी लोकांना माहित आहे की त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत जे नंतर खूप हिट ठरले आणि त्यापैकी एक जंजीर आहे.

Amitabh Bachchan’s Zanjeer : ‘जंजीर’ (zanjeer) हा चित्रपट 1973 साली प्रदर्शित झाला, ज्यामुळे चित्रपटसृष्टीला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या रूपाने ‘अँग्री यंग मॅन’ मिळाला. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांचे नशीब फिरले.

पण फार कमी लोकांना माहिती आहे की, धर्मेंद्र (Dharmendra) यांनाही या चित्रपटात काम करायचे होते. धर्मेंद्रने सलीम-जावेद यांच्याकडून ‘जंजीर’ची स्क्रिप्ट विकत घेतली होती आणि त्यांना त्यात नायक म्हणून काम करायचे होते पण बहिणीमुळे धरम पाजी इच्छा असूनही त्यात काम करू शकले नाहीत.

अशी केली युक्ती

जंजीर रिलीज होण्याच्या एक वर्ष आधी धर्मेंद्र यांनी दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्यासोबत ‘समाधी’ चित्रपटात काम केले होते. धर्मेंद्रने डाकूची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. अशा परिस्थितीत धर्मेंद्र यांनी प्रकाश मेहरा यांच्यासोबत ‘जंजीर’च्या स्क्रिप्टवर चर्चा केली तेव्हा त्यांनाही ही कथा आवडली.प्रकाश मेहरा यांनाही धर्मेंद्रसोबत ‘जंजीर’ बनवायचा होता पण धर्मेंद्र यांनी नकार दिला.

पण प्रकाश मेहरा यांना चित्रपटाची कथा एवढी आवडली की त्यांना ते कसेही करून दिग्दर्शन करायचे होते. त्यासाठी त्यांनी एक कल्पना सुचली आणि ‘कहानी किस्मत की’ या दुसऱ्या चित्रपटाची कथा धर्मेंद्र यांना दिली आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून जंजीरची कथा घेतली.

बहिणीमुळे चित्रपट नाही केला

‘कहानी किस्मत की’ या चित्रपटात धर्मेंद्र आणि रेखा यांनी काम केले होते. त्याचवेळी प्रकाश मेहरा यांनी ‘जंजीर’मध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना कास्ट केले होते. ‘जंजीर’ सुपरहिट ठरला. पण धर्मेंद्रने ही ऑफर तशीच नाकारली नाही, त्यामागेही एक मोठं कारण होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, याबाबत बोलताना धर्मेंद्र यांनी सांगितले होते की, त्यांचा चुलत बहीण आणि प्रकाश मेहरा यांच्यात काही नाराजी होती. याच कारणामुळे त्याने प्रकाश मेहरा यांच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. बहिणीमुळे धर्मेंद्रनेही मोठा चित्रपट नाकारला.

Follow us on

Sharing Is Caring: