Devoleena Bhattacharjee Wedding: स्टार टीव्ही वरच्या ‘साथ निभाना साथिया’ (Saath Nibhaana Saathiya) मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री दवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) सध्या आपल्या सीक्रेट वेडिंगमुळे जोरदार चर्चेत आली आहे.
१३ डिसेंबर रोजी देवोलिनाच्या हळदी आणि मेहेंदीचे फोटो समोर आले होते. तर १४ डिसेंबरला आज नववधूच्या पेहरावात तिनं आपले फोटो शेअर केले आहेत. आता हे कन्फर्म झालं आहे की देवोलिनाचे लग्न झाले आहे.

अर्थात,गेल्या काही दिवसांत तिचा पती कोण हे एक मोठं रहस्य झालं होत. आता सगळ्यांसमोर त्याचा खुलासा झाला आहे अन् देवोलिनाचं सीक्रेट वेडिंग समोर आलं आहे.(Tv Serial: Devoleena Bhattacharjee secret wedding with gym trainer shahnawaz sheikh)
देवोलिना भट्टाचार्जी ही छोट्या पडद्यावर (Television – TV) ची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. देवोलिना आधी अनेकांनी सीक्रेट वेडिंग केलं आहे. पण आतापर्यंत कोणी आपल्या होणाऱ्या बायकोचा किंवा नवऱ्याचा चेहरा लपवून ठेवला नव्हता. आता चर्चा आहे की देवोलिनाने शहनवाज शेख नामक व्यक्तीसोबत लग्न केलं आहे.
शहनवाज शेख हा व्यवसायाने जीम ट्रेनर आहे अशी बातमी आहे. बिग बॉस १३ (Bigg Boss) दरम्यान देवोलिना भट्टाचार्जीनं आपल्या प्रेमाची कबूली दिली होती. पण तेव्हा ती व्यक्ती कोण हे मात्र तिनं गुपित ठेवलं होतं.
देवोलिना आणि शहनवाजची भेट जीममध्ये झाली होती, जी जीम अभिनेत्रीच्या घराजवळच आहे. ‘साथिया..’ शो च्या सेटवर देवोलिनाचा अपघात झाला होता त्यादरम्यान शहनवाज देवोलिनाचा आधारस्तंभ बनला होता आणि त्यानेच तिला त्या अपघाताच्या धक्क्यातून सावरायला मदत केली होती.
शहनवाजच्या याच केअरिंग स्वभावानं देवोलिनाचं मन जिंकण्यास मदत केली. यानंतर कपलने साधारणपणे २ वर्ष एकमेकांना डेट केलं. आणि आता लग्नगाठ बांधून आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.
देवोलिना आणि विशाल सिंग दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. या दोघांमधील बॉन्ड पाहून वाटायचं की हे दोघे एकमेकांना डेट करत असतील, पण अनेकदा दोघांनी आपण चांगले मित्र आहोत हे स्पष्ट केलं. देवोलिनाच्या लग्नात विशाल सिंग तिचा बेस्ट फ्रेंड म्हणून सहभागी झाला होता.