Bollywood Stories : पहिल्याच चित्रपटानंतर Salman Khan चे करिअर बुडणार होतं, नंतर एका खोट्या अफवेनं बदललं नशीब!

Salman Khan Movies: सलमान खान (Salman Khan) ने बॉलीवुड करिअरची सुरुवात मैंने प्यार किया या चित्रपटातून केली होती. पण या चित्रपटानंतर सलमानला काम मिळत नव्हते, मग असे काही घडले की भाईजानचे नशीबच पालटले.

Salman Khan First Movie : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. अबालवृद्ध सर्व सलमान खानचे आणि त्याच्या फिल्मचे (Salman Khan Movies) चाहते आहे, पण एक वेळ अशी आली होती जेव्हा एका खोट्या अफवेने भाईजानचे करिअर वाचवले होते. होय… हे खरे आहे की, ‘मैने प्यार किया’ या मुख्य नायक असलेल्या पहिल्या चित्रपटानंतर सलमान खानचे करिअर बुडणार होते. सलमान खान अनेक महिने रिकामा घरी बसला होता पण त्याला एकही चित्रपट मिळाला नाही.

6 महिने रिकामा बसला सलमान!

सलमान खानने स्वतः ही गोष्ट एका शोदरम्यान सांगितली. 2019 मध्ये जेव्हा सलमान इंडिया टीव्ही शोमध्ये पोहोचला तेव्हा त्याने सांगितले की, मैंने प्यार किया या चित्रपटानंतर तो 6 महिने रिकामा बसला होता, त्याला कोणी काम देत नव्हते. सलमान खान (Salman Khan New Film) म्हणतो, ‘त्या चित्रपटांनंतर त्याला काम मिळणार नाही असे वाटले. कारण भाग्यश्री मॅडमने तेव्हाच ठरवले होते की ती यापुढे चित्रपट करणार नाही आणि लग्न करणार आहे. ‘मैने प्यार किया’चे संपूर्ण श्रेय भाग्यश्रीने घेतले आणि त्यांनी लग्न केले.

एका अफवेने त्याचे करिअर वाचवले!

सलमान खान म्हणाला, “लोकांना वाटले की ‘मैने प्यार किया’मध्ये भाग्यश्रीने मुख्य काम केले आहे.” सलमान म्हणाला, “या सर्व प्रकारानंतर त्याच्या वडिलांनी (सलीम खान) जीपी सिप्पी सरांना फोन केला आणि त्यांना सांगितले, बघ यार, माझ्या मुलाला काही काम नाही, एक घोषणा दे. मग एका मासिकात अनाउंसमेंट आली की जीपी सिप्पीने सलमान खानला साइन केले आहे.’

एक किस्सा सांगताना सलमान खान (Salman Khan) म्हणाला होता, ‘जेव्हा जीपी सिप्पीची घोषणा झाली, त्यानंतर चार लोक त्याच्याकडे आले.’ पुढे स्पष्टीकरण देताना सलमान म्हणाला, ‘टिप्स कंपनीचे मालक रमेश तौरानी जीपी सिप्पी यांच्याकडे आले आणि त्यांनी म्युजिकसाठी पाच लाख रुपये दिले, त्यानंतर 5 लाखांच्या चक्कर मध्ये संपूर्ण फिल्म बनली’

Follow us on

Sharing Is Caring: