Breaking News
Home / एंटरटेनमेंट / कोणास मगरी चे मांस, तर कोणास मुगलई पदार्थ खाणे पसंत आहे, या आहेत तुमच्या फेवरेट स्टार च्या फेवरेट डिश

कोणास मगरी चे मांस, तर कोणास मुगलई पदार्थ खाणे पसंत आहे, या आहेत तुमच्या फेवरेट स्टार च्या फेवरेट डिश

सामान्य जीवनात प्रत्येकास वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ खाण्याची फार आवड असते आणि प्रत्येकाचे नक्कीच काही आवडते पदार्थ असतात, जे त्यांना खायला आवडतात. आणि सामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूड स्टार्ससुद्धा खवय्ये असतात, म्हणून आज आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या स्टारच्या आवडत्या खाद्यपदार्थां विषयी सांगत आहोत.

सोनम कपूर : अभिनेत्री सोनम कपूरला खाद्यपदार्थाची खूप आवड आहे, पण तिला घरी बनवलेल्या जेवणापेक्षा स्ट्रीट फूड जास्त आवडतात आणि रस्त्याच्या कडेला मिळणारे चाट, पाव भाजी यासारख्या गोष्टी तिला आवडतात.

करीना कपूर : जर आपण बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरबद्दल बोललो तर तिची आवडती डिश घरगुती वरण भात आहे आणि ती नेहमी फक्त घरात बनलेलं वरण भात खात असते.

आलिया भट्ट : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला भारतीय पदार्थ, रसगुल्ला आणि गुलाब जामुन आवडत असले तरी त्याचबरोबर तिला चायनिज आणि गुजराती पदार्थ खाण्याची खूप आवड आहे.

शाहिद कपूर : बॉलिवूड अभिनेता शहीद कपूरच्या आवडत्या पदार्थांबद्दल बोलायचं झाल तर त्याला घरगुती राजमा-चावल आवडतो आणि तो ते मोठ्या आवडीने खातो.

रणबीर कपूर : जर आपण रणबीर कपूरबद्दल बोललो तर त्याची आवडती डिश भारतीय लोकांपेक्षा थोडी वेगळी आहे, रणबीर कपूरला मगरीचे मांस खाणे खूप आवडते आणि हे आम्ही बोलत नाही, तर खुद्द एका मुलाखतीत रणबीर कपूरने याचा उल्लेख केला आहे.

शाहरुख खान : बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणार्‍या शाहरुख खानची आवडती डिश तंदुरी चिकन आहे, त्याला तंदुरी चिकन खायला आवडते.

अक्षय कुमार : अक्षय कुमार आपल्या हेल्थ ची खूप काळजी घेतो, ज्यासाठी तो फक्त हिरव्या भाज्या खायला प्राधान्य देतो.

सलमान खान : बॉलिवूडचा दबंग भाईजान म्हणजेच सलमान भाईच्या खाद्यपदार्थाच्या आवडी बद्दल बोलायच झाल तर त्याला आईने हाताने बनवलेले चिकन खायला आवडते.

अमिताभ बच्चन : जर आपण बिग-बीबद्दल चर्चा केली तर आपल्या आरोग्याची काळजी घेत ते घरी बनवलेले सिम्पल पदार्थ खाणे पसंत करतात ज्यामध्ये दूध, अंडी भुर्जी, मसूर, रोटी, भात आणि भाज्या यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

About AMIT GHANASHYAM VELEKAR

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.