Anushka Sharma: अनुष्का शर्मा सध्या नवीन शोच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. नुकतीच तिची ‘माई’ ही वेबसिरीज ओटीटीवर रिलीज झाली आहे. अनुष्का तिची मुलगी वामिका आणि पती विराट कोहलीसोबत तिचा वैयक्तिक वेळ घालवताना दिसत आहे.

पण आता अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या गरोदरपणाबाबतचे तिचे विधान सध्या व्हायरल होत आहे. त्यावर अनुष्काने मोठा खुलासा केला आहे.

रिपोर्ट्सनुसार, अनुष्काने स्पष्ट केले की तिला सुरुवातीला आई बनण्याची भीती वाटत होती, ती म्हणाली, “आई बनण्याच्या सुरुवातीला मला खूप भीती वाटत होती आणि आई झाल्यानंतर माझा प्रवास कसा असेल याची मला कल्पना नव्हती.”

अनुष्का शर्माने पुढे खुलासा केला, “आज जेव्हा विराट आणि मी माझ्या गरोदरपणाची आठवण काढतो, तेव्हा आम्हाला समजते की आम्ही घेतलेली काळजी अनेक प्रकारे खूप मौल्यवान होती. आज जेव्हा मी स्वतःकडे पाहते तेव्हा मला जाणवते की आज मी खूप गंभीर आहे आणि मी घेतलेले ते निर्णय माझ्यासाठी योग्य आहे”, अनुष्काने तिच्या भावना व्यक्त केल्या.

अनुष्का शर्मा लवकरच ‘चक्डा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे.