भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर Youtuber Elvish Yadav Big Boss OTT चा विजेता घोषित करण्यात आला आहे. 2016 मध्ये एल्विश यादवने (Elvish Yadav) आपला प्रवास सुरू केला. एल्विश यादवने या 7 वर्षांत बरीच प्रगती केली.
एल्विश यादवचे दोन युट्युब (Youtube) चॅनल आहेत. एक एल्विश यादव ब्लॉग, दुसरा एल्विश यादव. सोशल मीडियावर इलिश यादवची फॅन फॉलोइंगही चांगली आहे. एल्विश यादवने बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यापासून त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
वाइल्ड कार्ड एंट्री पहिल्यांदा जिंकली:
बिग बॉसच्या संपूर्ण इतिहासात कधीही वाइल्ड कार्ड स्पर्धकाने फायनल जिंकलेली नाही पण आज इतिहास बदलताना दिसला आणि वाइल्ड कार्ड एंट्रीद्वारे बिग बॉस OTT 2 मध्ये प्रवेश करणारा एल्विस यादव आज बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता ठरला.
यादरम्यान त्याने आपले जवळचे प्रतिस्पर्धी अभिषेक मल्हान आणि मनीषा राणी यांचा पराभव केला. एल्विश यादव हा गुरुग्रामचा रहिवासी आहे, त्याच्या वडिलांचे नाव राम अवतार यादव आणि आईचे नाव सुषमा यादव आहे.
एल्विश यादव नेट-वर्थ: एल्विश यादव किती श्रीमंत आहे:
एल्विश यादवची एकूण संपत्ती 6.4 कोटींपर्यंत आहे. याशिवाय एल्विश यादवकडे अनेक आलिशान वाहने आहेत. बिग बॉस जिंकल्यानंतर एल्विश यादवकडे आता चित्रपटांच्याही ऑफर आहेत. एल्विश यादवचे सोशल मीडियावर एकूण 13.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.
आशिष चंचलानी आणि हर्ष बेनिवाल यांचे व्हिडिओ पाहून एल्विश यादवने युट्युबवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. एल्विश यादवने टिकटॉकवर अनेक व्हिडिओही बनवले आहेत.