Aaradhya Bachchan : ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)यांची मुलगी आराध्या बच्चन ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की वयाच्या 11 व्या वर्षी ती करोडोंच्या संपत्तीची मालक आहे.
आराध्या ही अभिषेक आणि ऐश्वर्या यांची एकुलती एक मुलगी आहे. हेच कारण आहे की ती केवळ आई-वडिलांचीच नाही तर तिचे आजोबा आणि आजी यांची देखील लाडकी आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आराध्या केवळ महागड्या कारचीच नाही तर आलिशान घराची देखील मालकीण आहे.
रिपोर्ट्सनुसार, जेव्हा आराध्या एक वर्षाची होती, तेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेकने तिला लाल रंगाची मिनी कूपर कार गिफ्ट केली होती, याशिवाय अभिषेकने तिला ऑडी a8 देखील भेट दिली होती.
यासोबतच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या जलसा या बंगल्याच्या मागे आणखी एक बंगला विकत घेतला जो त्यांनी आराध्याला भेट म्हणून दिला. त्याची किंमत 60 कोटींहून अधिक आहे.
सध्या आराध्या (Aaradhya Bachchan) धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. ज्यांचे शाळेतील फंक्शन्सचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.