Breaking News
Home / एंटरटेनमेंट / बिग बॉस विजेत्या अभिनेत्याचे वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराने निधन

बिग बॉस विजेत्या अभिनेत्याचे वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराने निधन

बिग बॉस विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. कपूर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याने अखेरचा श्वास घेतला.

सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्या अगोदर औषधं घेतली. या नंतर सकाळी तो झोपेतून उठला नाही. त्याला सकाळी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्या नंतर त्यास मृत घोषित करण्यात आले.

सिध्दार्थ चे रात्री हार्ट अटॅकने निधन झाल्याचे सांगण्यात आले. सिद्धार्थ बिग बॉस 13 सीजनचा विजेता होता.

12 डिसेंबर 1980 रोजी मुंबईत अशोक शुक्ला आणि रीता शुक्ला यांच्याकडे जन्मलेल्या सिद्धार्थच्या कुटुंबाची मुळे उत्तर प्रदेशातील प्रयागराज (पूर्वी अलाहाबाद) येथे आहेत. त्यांनी सेंट झेवियर्स हायस्कूल, फोर्टमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर रचना संसद स्कूल ऑफ इंटिरियर डिझाईनमधून इंटिरियर डिझायनिंगमध्ये पदवी प्राप्त केली.

सिद्धार्थ “बालिका वधू” आणि “दिल से दिल तक” सारख्या डेली सोप मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो “झलक दिखला जा 6”, “फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी” आणि “बिग बॉस 13” सारख्या रिअॅलिटी शोमध्ये त्याच्या रंगछटांसाठी लोकप्रिय आहे

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी येताच, अनेक सेलिब्रिटीज तसेच त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर शोकसंदेश भरले.

वर्ष २०२० मध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचे धक्कादायक निधन झाले जे 14 जून रोजी मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत सापडले.

About AMIT GHANASHYAM VELEKAR

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.