Peoplerelationship

एका सवयीमुळे काय काय यातना भोगाव्या लागल्या यांना, तुम्ही पण रहा सावधान

कधी कधी आपल्याला जाणते अजाणते कोणत्याही गोष्टीची सवय लागते किंवा व्यसनच म्हणाना लागते. असेच झाले अमेरिकेत राहणाऱ्या ऑस्टीन सोबत. कामाचे प्रेशर असल्यामुळे त्यांना एक सवय लागली ती सवय त्यांना पुढे एवढी महागात पडेल असे कधी वाटले नसेल. कामाच्या प्रेशर मध्ये त्यांनी काही महिने भरपूर एनर्जी ड्रिंक्स घेतले होते. एवढी एनर्जी ड्रिंक पिण्यामुळे त्यांना ब्रेन हेमरेज झाला. त्या दरम्यान त्यांची पत्नी देखील प्रेग्नंट होती.

ऑस्टीनची पत्नी ब्रिएन ने आपल्या फेसबुक वर त्यांची स्टोरी शेयर केली आहे. ती सांगते की ती रात्री झोपत होती, तेव्हाच तिच्या सासूने तिला बोलावून सांगितले की ऑस्टीनचा एक्सीडेंट झाला आहे. जेव्हा ते हॉस्पिटल मध्ये पोहचले तेव्हा डॉक्टर्स नी त्यांना सांगितले की, ऑस्टीन ने प्रमाण पेक्षा जास्त एनर्जी ड्रिंक घेतली आहे, ज्यामुळे त्यांना ब्रेन हेमरेज झाला आहे. ब्रिएन सांगते की ऑस्टीन चे ऑपरेशन 5 तास चालले. जेव्हा ऑपरेशन संपल्या नंतर ती ऑस्टीनला भेटण्यासाठी खोलीत गेली तेव्हा त्यांनी पाहिले की ऑस्टीनच्या डोक्यावर समोरच्या बाजूला होल झाले आहे. ब्रिएन ऑस्टीन सोबत ऑपरेशन झाल्यावर 2 आठवडे हॉस्पिटल मध्येच राहिली.

त्यांच्या मुलाचा जन्म

ऑस्टीनच्या हॉस्पिटल मध्ये एडमिट होण्याच्या 2 आठवड्या नंतर, ब्रिएन ने आपल्या मुलाला जन्म दिला. ती आपल्या मुला सोबत फक्त एक आठवडाच राहिली आणि मुलाला परत आपल्या सासू-सासऱ्यांना सोपवून ऑस्टीनकडे गेली. तो पर्यत ऑस्टीन कोमा मध्ये गेला होता. ऑस्टीन 2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आला आणि आपल्या मुलाला भेटला.

ऑस्टीन आता निरोगी आहे

ब्रिएन सांगते ती आनंदी आहे की ऑस्टीन आता चांगला आहे आणि आपल्या मुला सोबत राहत आहे. पण आता ही त्यांना डॉक्टरांच्याकडे वारंवार जावे लागते आणि त्यांना मुला सोबतच ऑस्टीनची पण काळजी घ्यावी लागते.


Show More

Related Articles

Back to top button