food

99 टक्के लोकांना अंड्याच्या कवचाचे हे फायदे माहित नाहीत, तुम्हाला देखील माहित नसतील

अंडी फोडल्यानंतर त्याचे कवच आपण सरळ कचऱ्यात टाकतो पण कधी आपण विचार केला नाही कि याचे देखील काही फायदे असू शकतात.  त्याचे काही उपयोग आहेत. पण कदाचित ते आपल्याला माहित नाहीत म्हणूनच विचार न करता अंडे फोडून झाल्यावर कवचाला आपण केराची टोपली दाखवतो. पण हे आहेत अंड्याच्या कवचाचे फायदे… कदाचित तुम्हाला माहित नसतील…

अंड्याच्या कवचापासून किडे किटाणू दूर पळून जातात.

कपड्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी अंड्याचा कवच वापरु शकता. त्यासाठी लहान बादलीत दोन चमचे अंड्याच्या कवचाची पावडर घाला. त्यात रात्रभर कपडे भिजवत ठेवा. दुसऱ्या दिवशी कपडे धुतल्यावर त्यावर वेगळीच चमक दिसेल.

फळे आणि भाज्यांवर काही काळाने किडे घोंगावू लागतात. अशावेळी अंड्याचे कवच फोडून ते भाज्या, फळांजवळ ठेवा. किडे दूर होतील.

मेणबत्ती म्हणून तुम्ही अंड्याच्या कवचाचा प्रयोग करु शकता. त्यासाठी अंडे फोडून त्याच्या कवचात मेण भरा आणि त्यावर वात लावा. दिसायलाही ते फार सुंदर दिसते.

मांजरी घरात घाण करत असतील तर अंड्याचे कवच तुमच्या मदतील येईल. जिथे मांजरी जातात तेथे अंड्याचे कवच फोडून टाका. याचा परिणाम तुम्हाला लवकरच जाणवेल.

अंड्याच्या कवचाची पावडर चेहऱ्याला लावल्यास त्वचा टवटवीत दिसेल. त्वचेचा कोरडेपणा कमी होईल.

त्वचेची आग होत असेल किंवा खाज येत असल्यास अंड्याचे कवच वापरा.


Show More

Related Articles

Back to top button