बिना सुई धागा किंवा मशीन वापरता कोणत्याही फाटलेल्या कापलेल्या कपड्यांना रिपेयर करा, ते देखील फक्त 30 सेकंदा मध्ये

here is a very easy solution for repair any cut or hole in any clothe

अनेक वेळा घाईगडबडी मध्ये किंवा इतर कारणामुळे आपले आवडते कपडे खिळ्या मध्ये किंवा एखाद्या टोकदार वस्तू मध्ये अडकून फाटतात किंवा त्यांना लहान मोठे होल पडते. अश्या वेळी ते कपडे आपल्याला जास्तच आवडत असल्याने आपण त्यांना फेकण्याच्या किंवा इतरांना देण्याच्या मनस्थितीत नसतो कारण आपल्याला अजूनही ते कपडे घालायचे असतात. पण त्यांना पडलेले होल खराब दिसते पण जर आपण त्याला रफ़ू केला किंवा सुईधाग्याने शिवले तर ते कापड फाटल्याचे दिसून येतेच अश्यावेळी खालील ट्रिक आपल्या कामी येऊ शकते ज्यामध्ये आपल्याला रफ़ू करण्याची गरज नाही किंवा सुईधाग्याने शिवण्याची देखील गरज नाही शिवाय कपडा फाटला आहे हे दिसत देखील नाही. चला तर पाहू ही ट्रिक काय आहे.

या पद्धतीने कपडे रिपेयर करण्यासाठी आपल्याला दोन वस्तूंची गरज आहे. या पद्धतीसाठी आपल्याला इस्त्री आणि पेपर फोम (paper foam) किंवा ज्यास फ्युजन पेपर (fusion paper) देखील बोलले जाते त्याचे दोन तुकडे लागतील हा पेपर कपड्यावर किती आकाराचा होल आहे त्या आकारा पेक्षा थोडा मोठा घ्यावा.

सगळ्यात पहिले पेपर फोमचे कैचीच्या मदतीने दोन तुकडे कापून घ्यावेत ज्या आकाराचा तुमचा कापड फाटलेला आहे. आपला कपडा जेवढा फाटला आहे त्यापेक्षा मोठ्या आकारा मध्ये पेपर फोम कापून त्याचे एकाच आकाराने दोन तुकडे करावेत.

पेपर फोम चे दोन तुकडे एका खाली एक ठेवावीत. पेपर फोम चे दोन्ही तुकडे एका खाली एक ठेवताना लक्षात ठेवा पेपर फोमच्या दोन्ही तुकड्यांचा गुळगुळीत भाग वरच्या बाजूला असला पाहिजे. कारण हे पेपर फोम उष्णतेच्या सानिध्यात आल्यावर यावर असलेला गम (चिकट पदार्थ) बाहेर येतो त्यामुळे पेपर चिकटल्या जातो.

आपण पेपर फोमचे दोन्ही तुकडे गुळगुळीत भाग वरच्या दिशेला करून कपड्याच्या खाली जेथे हॉल आहे तेथे ठेवा. म्हणजे खाली पेपर फोम ठेवा आणि त्यावर जेथे कपड्याला होल आहे तो भाग ठेवा.

आता बोटाच्या चिमटीचा वापर करून कपड्याला असलेला होल म्हणजेच फाटलेला भाग एकमेकांच्या जवळ करा आणि अश्या पद्धतीने सेट करा की कपडा फाटला आहे हे समजलं नाही पाहिजे.

आपण वर फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे फाटलेला भाग बोटांच्या मदतीने व्यवस्थित सेट केल्यावर त्यावरून गरम इस्त्री फिरवा यामुळे पेपर फोम मधील गम उष्णतेमुळे कपड्यास चिटकेल आणि पेपर कपड्याला चिटकेल ज्यामुळे तुम्ही कापड जसे सेट केले होते तसेच राहील.

गरम इस्त्री फिरवल्यामुळे पेपर फोम खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे कापडास चिटकेल. इस्त्री फिरवताना थोडेसे पाणी शिंपडावे यामुळे आपलं काम व्यवस्थित होईल. बस एवढं केलं की आपलं काम झालं.

आपण आपला कापड कोणताही रफ़ू किंवा सुईधागा न वापरता चांगला केला आहे हे आपण खालील फोटो मध्ये पाहू शकता. या पद्धतीने कापड रिपेयर केल्यास ते फाटलेले आहे हे बाहेरून समजून देखील येत नाही. या पद्धतीने आपण टी-शर्ट, जीन्स आणि शर्ट इत्यादी थोडे जाड कपडे रिपेयर करू शकता. अगदीच पातळ कपडे रिपेयर करणे थोडे कठीण होईल आणि पेपर पातळ कपड्यामधून दिसून देखील येईल.

पेपर फोम किंवा ज्यास फ्युजन पेपर देखील बोलले जाते हे तुम्हाला टेलरिंगचे सामान मिळते त्या दुकाना मध्ये मिळू शकते तसेच स्टेशनरीच्या दुकाना मध्ये देखील मिळू शकते. त्यामुळे हे आपल्याला सहज उपलब्ध होईल आणि आपण देखील आपले आवडते कपडे जे काही कारणामुळे फाटले आहेत ते रिपेयर करून पुन्हा परिधान करू शकता आणि यामुळे तुम्हाला किती आनंद होईल हे तुम्हाला तर माहीतच आहे ते आम्ही वेगळं सांगण्याची गरज नाही.