Uncategorized

कानातील मळ काढण्यासाठी सेफ्टी पिन नका टाकू, पहा सोप्पीआणि सुरक्षित पद्धत

आपल्याला माहीत आहे जर आपण आपल्या शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष नाही दिले तर आपण आजारी पडू. तर एखाद्या विशीष्ट भागाकडे दुर्लक्ष झाले तर शरीराच्या त्या भागा बद्दल आपल्याला काहीना काहीतरी समस्या निर्माण होतात यासाठीच आपण दररोज अंघोळ करतो, नियमित केस कापतो, आठवड्यातून एक वेळा नखे कापतो इत्यादी. पण आपण कानातील मळ साफ करणे विसरतो किंवा त्याकडे दुर्लक्ष होते. तर बहुतेक लोकांना कानातील मळ काढण्याची योग्य पध्दत माहीत नसते.

अनेक लोक कान स्वच्छ करण्यासाठी कानात सेफ्टी पिन टाकतात जे अत्यंत घातक ज्यामुळे तुमच्या कानाच्या पडद्यांना इजा पोचल्यामुळे कानाचे पडदे फाटू शकतात. तुम्ही चुकूनही काना मध्ये सेफ्टी पिन टाकून कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका.

कानात जास्त मळ जमा झाला तर खालील समस्या होतात.

कान आपल्या शरीराचा एक अत्यंत संवेदनशील भाग आहे. यासाठी त्याची काळजी घेणे गरजेचे आहे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कानात जास्त मळ जमा झाल्यामुळे कानात खाज येणे, कमी ऐकू येणे इत्यादी समस्या होतात.

कानातील मळ ईयर वैक्स या नावाने पण ओळखले जाते. हे खरे आहे की अनेक घरगुती उपायांनी कानातील मळ स्वच्छ केला जाऊ शकतो पण असे करताना अतिक्षय काळजी घेणे गरजेचे आहे.

खरेतर ईयर वैक्स कानाच्या सुरक्षेसाठी असतो पण जेव्हा हे प्रमाणापेक्षा जास्त जमा होते तेव्हा ऐकण्यास कमी येते. तर अनेक वेळा कान दुखणे आणि संक्रमण होण्याची भीती आहे.हे ईयरड्रम पण ब्लॉक करते.

ईयरफोन सारखे उपकरणे वापरणे आणि वेळोवेळी ईयर-बड वापरल्यामुळे कानात मळ आतील बाजूस जमा होतो. यामुळे अनेक समस्या होऊ शकतात.

कानातील मळ सुरक्षित कसा काढता येईल.

कानातील मळ सुरक्षित काढण्यासाठी खाली उपाय करा.

पाण्याला थोडे कोमट करा. यानंतर ईयरबड च्या मदतीने आपल्या कानामध्ये थोडे थोडे पाणी घाला. गरम पाणी तुमच्या कानातील मळ स्वच्छ करतो. यानंतर काना जमिनीकडे करून कानातील पाणी काढून टाका. हा कानातील मळ काढण्याचा सर्वात सोप्पा उपाय आहे.

पुढील उपाय गरम पाणी आणि मीठ यांचा आहे.

गरम पाण्यात थोडेसे मीठ मिक्स करा. या मिश्रणाला ईयरबडवर लावून कानामध्ये फिरवा. असे केल्यामुळे कानाचा पीएच (PH) लेवल टिकून राहते. हा तुमच्या कानाला संपूर्ण स्वच्छ करण्याचा चांगला आणि सोप्पा उपाय आहे.

अदरक आणि लिंबू यांचा रस कानातील मळ काढण्यासाठी असा वापरा.

अदरकच्या रसा मध्ये लिंबूचा रस मिक्स करा. यानंतर हे मिश्रण ईयरबडला लावून कानात फिरवा. असे केल्याने कानाचा PH लेवल टिकून राहतो. या उपायामुळे कान अगदी सहज स्वच्छ होतो.

आणि आता आहे आपल्या सर्वांना अर्धवट माहीत असलेला उपाय.

आपण कानातील मळ काढण्यासाठी खोबरेल तेल कानात टाकतो त्या एवजी बादाम तेल कानात टाकले तर कानातील मळ ढील्ला होतो आणि त्यामुळे कानातील मळ काढणे सोप्पे जाते.

जर कानात मळ कडक होऊन जमला असेल तर चांगले राहील की जर ते काढण्यासाठी एखाद्या डॉक्टरकडे जावे. कान हा संवेदनशील भाग आहे त्यासंबंधी कोणतीही जोखीम उचलली नाही पाहिजे.

आता सर्वात महत्वाचा आणि सर्वांनी अंमलात आणला पाहीजे ही टीप म्हणजे कानात कधीही पेन्सिल, माचिसची काडी, सेफ्टी पिन किंवा कोणतीही टोकदार वस्तू कानात टाकू नका त्या एवजी वर सांगितलेल्या उपाया पैकी कोणताही तुम्हाला सोप्पा वाटणारा उपाय करून पहा.

Related Articles

Back to top button