Hair Carehealth

घरीच बनवा नैसर्गिक हेअर डाय

आज अनेकांना केमिकल डायची ऍलर्जी होते. त्यामुळे त्यांच्यासमोर केस डाय करण्याचा मोठा प्रश्न उपस्थित होतो. यावर उपाय म्हणून नॅचरल डाय बाजारात आहे मात्र त्यातही मोठ्या प्रमाणात केमिकल असतात. पण काही घरगुती वस्तूंमधूनही डाय तयार करता येतो. पाहुया हा नॅचरल डाय कसा करावा ते..

लसूण सोलून काळा रंग होईपर्यंत भाजून घ्या. (लसूण जास्त प्रमाणात घ्यावा.)

गार झाल्यावर भाजलेला लसूण मिक्सरमधून बारीक करावा आणि तलम वस्त्राने गाळून घ्या. यामुळे लसणाची बारीक पावडर मिळेल.

आता ही पावडर ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळावी आणि घट्ट पेस्ट करावी.

हे मिर्शण एका पॅकबंद डब्यामध्ये ठेवावे. मात्र ते फ्रिजमध्ये ठेवू नये.

सात दिवसांनंतर डब्याचे झाकण उघडावे. आता ही पेस्ट लेप स्वरूपात केसांवर लावण्यास तयार आहे.

रात्री झोपताना केसांवर या पेस्टचा लेप द्यावा. दुसर्‍या दिवशी सकाळी धुवून टाकावा. शक्य असेल तर दुसर्‍या दिवशी केस धुवू नयेत. हा लेप केसात मुरायला हवा.

धुतल्यानंतर केस काळे झालेले दिसतीलच त्याप्रमाणे चमकही वाढलेली दिसेल.

हा नैसर्गिक डाय बराच काळ टिकतो. शिवाय केसांची कुठलीही हानी होत नाही. केसांचे आरोग्य सुधारणारा हा डाय अवश्य वापरायला हवा.

केस दीर्घकाळ काळे आणि सतेज रहावे. यासाठी आहारामध्ये लोह, आयोडीन आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असावा.


Show More

Related Articles

Back to top button