People

शास्त्रां अनुसार दुखी राहण्याचे असतात 10 मुख्य कारण, नक्की जाणून घ्या अन्याथा होईल पश्चाताप

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगला आणि वाईट काळ येतजात असतो. असा एकही व्यक्ती नाही ज्याच्या आयुष्यात नेहमी आनंद आणि सुख राहिले आहे. जर एखाद्याच्या आयुष्यात वर्तमानकाळात सुख आहे तर होऊ शकते कि भविष्यात त्यास दुखाःचा सामना करावा लागेल तर ज्याच्या आयुष्यात दुख आहे त्याला येणाऱ्या काळात सुख नक्कीच मिळेल. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेळे अनुसार चढउतार सुरूच असतात. पण जेव्हा मनुष्याच्या आयुष्यात दुख येते तेव्हा बहुतेक वेळा तो आपल्या भाग्यास आणि परमेश्वरास दोषी मानतो परंतु वास्तविक सत्य हे आहे कि मनुष्य आपल्या दुखाःचा स्वता जिम्मेदार असतो. खरतर व्यक्ती आपल्या जीवनामध्ये असे अनेक कार्य करतो ज्यामुळे त्यास येणाऱ्या काळामध्ये पश्चाताप करावा लागतो. शास्त्रामध्ये दुखी राहण्याचे काही मुख्य कारणे सांगितली आहेत ज्यांना व्यक्ती कळतनकळत करतो ज्यामुळे त्याला याचे परिणाम भोगावे लागतात. शास्त्रामध्ये दुखी राहण्याची काही कारणे सांगितली आहेत ज्यापैकी काही मुख्य खालील प्रमाणे आहेत.

दुखी राहण्यासाठी असतात हे मुख्य कारण

जर एखादा व्यक्ती कोणत्याही चुकीच्या व्यक्ती कडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत असेल तर अश्या व्यक्तीला अर्धे दुख मिळते आणि बाकीचे दुख चांगल्या आणि खऱ्या लोकांवर संशय केल्यामुळे मिळते.

जर व्यक्ती रात्री उशिरा झोपत असेल आणि सकाळी उशिरा उठत असेल तर हे त्याच्या दुखाःचे कारण बनू शकते.

जर व्यक्ती असत्य गोष्टीला सत्य मानून त्याअनुसार चालत असेल तर त्यास नेहमी दुखाचा मार्ग प्राप्त होतो.

अनेक लोक असे आहेत जे मांजरीला दुखाचे कारण मानतात पण सत्य हे आहे कि व्यक्ती कधीही आपल्या कर्मांना पाहत नाही कारण व्यक्तीच्या आयुष्यात दुख येण्याचे सगळ्यात मोठे कारण त्याचे कर्म असतात.

बहुतेक वेळा असे आढळून येते कि व्यक्ती आपल्या चुका मान्य करत नाही आणि आपल्या सगळ्या चुकांची जबाबदारी वेळ आणि परमेश्वर यांना मानतो जे दुखाचे कारण होते.

जो व्यक्ती कोणावरही विश्वास करत नाही आणि विनाकारण नेहमी असत्य बोलतो अश्या व्यक्तीच्या जीवनात भयंकर दुख येते.

जर व्यक्तीच्या कडून एखादे वाईट कार्य झाले असेल तर त्यास असेच टाळणे किंवा त्याबद्दल पश्चाताप नसणे दुख होण्याचे मुख्य कारण मानले जाते.

जी व्यक्ती स्वताच्या आनंदासाठी दुसऱ्याला त्रास देतो आणि दुसऱ्याचे सुख, आनंद हिरावून घेतो असे करून तो स्वताच्या आयुष्यात दुखांना आमंत्रण देतो.

जी व्यक्ती इकडे तिकडे बसून आपला बहुमुल्य वेळ वाया घालवते, जी व्यक्ती वेळेचे बिलकुल भान ठेवत नाही त्याच्या आयुष्यात नेहमी दुख येते.

जी व्यक्ती दुसऱ्याची थट्टा करते आणि दुसऱ्याला अपमानित करते अश्या व्यक्तीला भविष्यात दुख भोगावे लागते.

वरील गोष्टींचा आपण आपल्या आयुष्यात अवलंब केला तर आपल्याला जीवनामध्ये दुखाचा सामना करावा नाही लागणार असे शास्त्र सांगते. त्याच सोबत प्रत्येक व्यक्तीने या गोष्टी फॉलो केल्या तर प्रत्येकाच्या जीवनात सुख राहील कारण दुखाचे मूळ कारणच आपण आपल्या जीवनातून दूर केलेले असेल.

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close