Connect with us

दुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा

Astrology

दुधाचा छोटासा सोप्पा उपाय, आपल्याला सगळ्या संकटापासून देईल मुक्ती, महालक्ष्मीची राहील कृपा

दुध पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. दुध आपल्या शरीरासाठी अमृता समान आहे कारण दुध एक असा पदार्थ आहे ज्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे बहुतेक पोषक तत्व मिळतात. जर तुम्ही दुधाचे सेवन करता तर यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

याच सोबत दुधाचे काही ज्योतिषशास्त्रीय फायदे देखील सांगितले गेले आहेत. होय हे खरे आहे दुध फक्त आरोग्यासाठीच नाही तर आपल्या नशिबाला चमकवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. ज्योतिष अनुसार दुध चंद्राचे कारक मानले जाते. जर तुम्ही दुधाशी संबंधित काही उपाय केले तर आपल्या जीवनातील समस्या पासून सुटका मिळवण्यासाठी मदत मिळू शकते. दुधाचा वापर करून आपण ग्रहांचा मिळणारा वाईट प्रभाव दूर करू शकतो.

आज आपण या लेखा मधून दुधाच्या संबंधित प्रभावी ज्योतिषशास्त्रीय उपाय जाणून घेऊ ज्यांचा वापर करून आपण आल्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळवू शकतो आणि ज्यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होईल.

चला पाहू दुधाचे प्रभावी उपाय

जर तुम्हाला वाटते कि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी असावा तर यासाठी एका लोखंडी भांड्यामध्ये पाणी साखर दुध तसेच तूप मिक्स करावे. आता यास कोणत्याही पिंपळाच्या वृक्षाच्या सावलीत उभे राहून पिंपळाच्या मुळाशी अर्पित करावे. जर आपण हा उपाय केला तर यामुळे धनाची देवता माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरात नेहमी वास करेल.

आपण सोमवारच्या दिवशी लवकर उठून आपले सर्व प्रातविधी केल्यानंतर स्नान करून जवळी शिव मंदिरामध्ये जाऊन तेथे कच्चे दुध अर्पित केले पाहिजे. हा उपाय आपल्याला 7 सोमवार केला पाहिजे जर आपण हा उपाय केला तर यामुळे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. जर आपल्या कुंडली मध्ये कोणताही ग्रह वाईट प्रभाव पाडत असतील तर या उपायामुळे फायदा होईल.

जर व्यक्तीला आपल्या व्यापार किंवा नोकरी मध्ये समस्या येत असतील तर यापासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक सोमवारी शिव मंदिरा जाऊन पाण्यामध्ये दुध मिक्स करून शिवलिंगावर अर्पित करताना रुद्राक्ष माळेवर ओम सोमेश्वराय नमः चा  108 वेळा करावा. याच सोबत पोर्णिमेच्या दिवशी पाण्यात दुध मिक्स करून चंद्रास अर्ध्य देतांना घर आणि व्यावासायाच्या प्रगतीची प्रार्थना करावी. या उपायाचा प्रभाव लवकरच आपल्याला दिसून येईल आणि आपल्या घरामध्ये पैश्यांची कमी कधी राहणार नाही.

जर व्यक्तीच्या वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असेल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी गुरुवारच्या दिवशी सूर्य उदय होण्याच्या अगोदर दुधा मध्ये हळद मिक्स करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. याच सोबत थोडे मुग, तांदूळ आणि कुंकू इत्यादी पिंपळाच्या वृक्षास अर्पित करावे. आपल्याला हा उपाय 1 महिना नियमित करावा लागेल. आपण जर हा उपाय केला तर आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या पासून सुटका मिळेल पतीपत्नी मधील संबंध मधुर बनून राहतील.

Continue Reading
Advertisement
You may also like...

More in Astrology

Trending

To Top