health

भेगा पडलेल्या टाचांसाठी उपाय – पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय

सुंदर टाच ( Heel ) असणे हे प्रत्येकाला वाटते कारण भेगाळलेली टाच कोणालाही नको असते मग तुम्ही पुरुष असो किंवा स्त्री दोघांनाही मुलायम आणि सुंदर Heel पाहिजे असतात. कारण भेगा पडलेल्या टाचा चांगल्या दिसत नाही आणि जर यांचा वेळीच इलाज केला नाही तर त्यामध्ये वेदनांना सुरुवात होते. शक्यता आहे की जीवाणूचे संक्रमण सुध्दा होऊ शकते. यासाठी योग्य होईल वेळीच कोरड्या आणि भेगा पडलेल्या टाचांचा उपचार करण्याचे.

 

भेगा पडलेल्या टाचांसाठी उपाय – पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय.

  • आपल्या पायांना माश्चराईजर लावून ओलावा दया यानंतर सुती मौजे घाला.
  • आरामदायक पादत्राणे वापरा ज्यामुळे पायांना जास्त जागा मिळेल. कारण कडक आणि अरुंद पादत्राणांच्या मुळे वेदना वाढू शकतात.
  • पाय स्वच्छ करण्यासाठी चांगला एन्टी बायोटिक साबण वापरा यामुळे पाय चांगले स्वच्छ होतील आणि जीवाणू मरून जातील. ज्यामुळे संक्रमण होण्याची शक्यता फार कमी होईल.
  • जरुरी आहे की तुम्ही पायांना काही लोशन लावा ज्यामुळे पायांना योग्य मोश्चर मिळेल.
  • कधीही त्वचा कैचीने कापू नका यामुळे जास्त त्वचा निघेल आणि ते वेदनादायक ठरू शकते. त्याच सोबत संक्रमणाचा धोका होऊ शकतो.
  • आपल्या पायांना लिंबूने घासून नरम करा. आठवड्यातून असे कमीत कमी एकदा असे करा आणि काही तास असे केले पाहिजे कारण याचा परिणाम त्वरित मिळाला पाहिजे.
  • दररोज कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी सेवन करा.

कधी कधी कोरडया त्वचेवर घरगुती उपाय लागू पडत नाही. तसेच कोरडी त्वचा कोणत्या अन्य आजाराचे कारण असू शकते म्हणून डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.


Show More

Related Articles

One Comment

Back to top button