Connect with us

कोरडा खोकला, घश्यातील खवखव आणि नाक बंद या पासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

Health

कोरडा खोकला, घश्यातील खवखव आणि नाक बंद या पासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून घसा खवखवणे किंवा सुक्का खोकला आणि बंद नाक या समस्या होतात. पण यामुळे काही फरक नाही पडत कि हे आजार किती वेळा होतात, अन्न गिळताना त्रास होतो, सतत शिंक येते, डोकेदुखी इत्यादी समस्या सुरूच असतात पण यांचा उपचार करणे आवश्यक आहे. आपल्या भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तू यासाठी आपल्याला मदत करू शकतात. यातीलच एक वस्तू आहे इलायची जी गळा दुखणे आणि खवखवणे कमी करण्यास मदत करते. या लेखा मध्ये आंम्ही तुम्हाला इलायची कोणत्या पद्धतीने आपली समस्या दूर करण्यासाठी वापरावी हे सांगत आहोत.

सर्दी आणि खोकल्या मध्ये इलायची कशी मदत करेल

खरतर इलायची मधून निघणारे तेल एक उपयोगी उत्तेजक आहे, हे एंटीसेप्टिक आहे जे पचन तंत्र चांगले ठेवण्यासाठी मदत करते. गळा, सर्दी आणि खोकल्या मध्ये आराम देते. घसा खवखवणे आणि सर्दी याचे मुख्य कारण आतड्या मध्ये जमा झालेले विषाक्त पदार्थ आहे, यामुळे इम्यून सिस्टम प्रभावित होते. यासाठी इलायचीचे सेवन पचन व्यवस्थित करण्यासाठी केला जातो. इलायाचीचे इंटी-इंफ्लामेट्री गुण वेदना आणि सूज कमी करतो, खासकरून तोंडाच्या आणि गळ्याची सूज कमी करतो.

कफ आणि खोकल्यावर घरगुती उपाय

एक चिमुट इलायची पावडर, एक चिमुट सेंधव मीठ, एक चमचा गाईचे तूप आणि अर्धा चमचा मध हे सर्व व्यवस्थित मिक्स करा. यानंतर याचे सेवन करू शकता. या औषधाने खोकल्यामध्ये त्वरित आराम देईल.

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय

इलायची आणि लवंग यांचे मिश्रण एक चांगले औषधी म्हणून वापरता येईल. हे तुमच्या फुफुसाना प्रभावित करणाऱ्या प्रदूषण आणि धुळीमुळे गळ्यात होणारी जळजळ कमी करतो. या दोन्ही वस्तू मध्ये एंटीऑक्सीडेंट असते जे प्रदूषणाचा प्रभाव कमी करतो.

गळ्याची खवखवीवर घरगुती उपाय

पाण्यामध्ये एक इलायची टाकून पाणी कोमट करावे. या पाण्याने सकाळ-संध्याकाळ गरारा करा यामुळे घश्यातील खवखव कमी होईल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top