Breaking News

डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी केईएम रुग्णालयात अश्या प्रकारे रुग्ण सेवा करत आहेत…

कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे आणि आता तो भारता मध्ये देखील पसरत आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. तर भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ देखील आली आहे.

अश्या कठीण प्रसंगी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, बिझनेसमन, राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत. या सगळ्या मध्ये डॉ. अमोल कोल्हे हे देखील कुठेही मागे नाहीत. ते मोठ्या प्रमाणावर गरजूंना मदत करत असून या संकटकाळात चांगले काम करत आहेत.

आपल्याला माहीत असेलच कि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेले आहे.

त्यांच्या पत्नी अश्विनी कोल्हे या देखील डॉक्टर आहेत. डॉ. अश्विनी अमोल कोल्हे या सध्या मुंबई मधील केईएम हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहेत. त्या २००९ पासून या हॉस्पिटल मध्ये रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोनाच्या या संकटसमयी देखील त्या त्यांचे कर्जव्य बजावत आहेत. त्या दररोज केएम हॉस्पिटल मध्ये जाऊन रुग्णांवर उपचार करत आहेत.

केईएम हॉस्पिटल मध्ये अनेक कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांची केईएम हॉस्पिटल मध्ये खूप चांगली काळजी घेतली जात असून त्यातील अनेक रुग्ण बरे होऊन त्यांच्या घरी देखील परतले आहेत.

डॉ. अमोल कोल्हे हे एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच खासदार देखील आहेत. शिरुर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.