Connect with us

सारखे सारखे शरीराच्या या 5 भागाला स्पर्श करू नका, कारण असतात हानिकारक बैक्टीरिया

Health

सारखे सारखे शरीराच्या या 5 भागाला स्पर्श करू नका, कारण असतात हानिकारक बैक्टीरिया

या जगा मध्ये सगळीकडे आणि प्रत्येक वेळी बैक्टीरिया उपस्थित आहेत, एवढेच नाही तर आमच्या आणि तुमच्या शरीरावर आणि कपड्यावर पण बैक्टीरिया आहेत. तुम्हाला वाटत असेल कि बैक्टीरिया म्हणजे आपले शत्रू आणि नेहमी आपल्याला अपायकारक असतात. पण असे नाही आहे कारण असे अनेक बैक्टीरिया आहेत जे तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी आपली भूमिका बजावत असतात. आपल्या शरीरावर असे काही भाग आहेत जेथे शरीराच्या इतर भागाच्या तुलनेत जास्त बैक्टीरिया असतात. त्यामुळे जर तुम्ही चुकून किंवा सवयीमुळे याभागांना सतत स्पर्श करत असाल तर तुम्ही आजारी पडू शकता. चला पाहू शरीराच्या कोणत्या भागाला सतत स्पर्श करू नये.

बोटांवर बैक्टीरिया

आपल्या बहुतेक सर्व कामासाठी आपण बोटांचा वापर करतो. यामुळे आपल्या बोटांवर आणि हातावर अनेक हानिकारक बैक्टीरिया आणि वायरस असतात. याच बोटांनी जेव्हा आपण डोळ्यांना स्पर्श करतो तेव्हा डोळ्यामध्ये हे हानिकारक बैक्टीरिया जातात. अनेक वेळा हे बैक्टीरिया डोळ्यामध्ये खाज येणे आणि डोळ्यातून पाणी येणे या सारख्या समस्या निर्माण करतात.

मुरुमांमध्ये बैक्टीरिया

चेहऱ्यावर मुरुमांचा त्रास होत असेल तर तुमचा हात नेहमी तेथे जातो आणि तुम्ही सतत त्या मुरुमांना स्पर्श करता. मुरुमांचे कारण हानिकारक बैक्टीरिया असते. जेव्हा तुम्ही सतत या मुरुमांना स्पर्श करता तेव्हा हे बैक्टीरिया चेहऱ्याच्या इतर भागात पसरतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर इतर ठिकाणी मुरुमांचा त्रास वाढतो. तसेच जर तुम्हाला सतत विनाकारण चेहरा स्पर्श करण्याची सवय असेल तर त्यामुळे देखील मुरुमांची समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते कारण बोटांवर असलेले बैक्टीरिया चेहऱ्याच्या त्वचेत जातात आणि मुरुमे येण्यास सुरुवात होते.

तोंडात बैक्टीरिया

अनेक वेळा लोक जेवणा नंतर दातांमध्ये अडकलेल्या अन्न पदार्थ काढण्यासाठी किंवा सहजच आपल्या तोंडा मध्ये हात टाकतात किंवा आपल्या ओठांना सतत स्पर्श करतात. तुमच्या या सवयीमुळे बोटांवर असलेले बैक्टीरिया तोंडात जातात आणि तोंडात असलेले बैक्टीरिया हाताला लागतात. बैक्टीरियाचे असे पसरणे तुमच्या तोंडासाठी घातक होऊ शकते आणि यामुळे तोंडाची दुर्गंधी, दातदुखी आणि दातकिडणे अश्या समस्या होऊ शकतात.

नाकामध्ये बैक्टीरिया

नाकाच्या आत मध्ये अनेक प्रकारचे बैक्टीरिया आणि वायरस असतात. जेव्हा तुम्ही नाकामध्ये बोट टाकता तेव्हा तुमच्या नाकामध्ये असलेले बैक्टीरिया तुमच्या हाताला लागतात आणि हातावर असलेले बैक्टीरिया नाका मध्ये जातात. नाकामध्ये गेले हे बैक्टीरिया श्वासाच्या मदतीने फुफुसा पर्यंत जातात आणि अनेक समस्या निर्माण करू शकतात.

नखामध्ये बैक्टीरिया

नखाच्या आतील भागात अनेक हानिकारक बैक्टीरिया असतात. यासाठी डॉक्टर तुम्हाला नखे नियमित कापण्याचा सल्ला देतात आणि पातळ किंवा ओले पदार्थ हाताने खाण्यास मनाई करतात. कारण नखामध्ये असलेले हानिकारक बैक्टीरिया पोट आणि पचनक्रिया संबंधित समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे जेवणाच्या आधी आणि नंतर हात व्यवस्थित धुवावेत.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top