Connect with us

फक्त 2 दिवसात गुटखा, तंबाखूच व्यसन कमी करू शकतो हा रामबाण घरगुती उपाय

Food

फक्त 2 दिवसात गुटखा, तंबाखूच व्यसन कमी करू शकतो हा रामबाण घरगुती उपाय

अनेक लोकांना माहित असते की तंबाखू, गुटखा खाण्याची सवय आरोग्याला घातक आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका या सवयीमुळेच बळावतो. हे सर्व माहित असून देखील लोक विषाची परीक्षा घेणे पसंत करतात आणि तंबाखू, गुटख्याची चव चाखतात. पण एकदा तंबाखू, गुटख्याचं व्यसन जडलं तर ते सोडवणंदेखील अवघड होऊन बसते. अनेकजण याकरिता व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेतात. मात्र इच्छाशक्ती असेल आणि हा घरगुती उपाय केल्यास तुम्हांला नक्कीच अवघ्या काही दिवसात तंबाखू, गुटख्याचं व्यसन सोडणं शक्य आहे.

तंबाखूचं व्यसन सोडण्याचा रामबाण उपाय

तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी ओवा हा मसाल्याचा पदार्थ फायदेशीर ठरतो. ओव्याला तव्यावर भाजा. भाजल्यानंतर ओवा थोडा हलका आणि कमी तिखट होतो.

भाजलेला ओवा तुम्ही तंबाखू आणि गुटख्याप्रमाणे खाऊ शकता.

ज्याप्रकारे तुम्ही तंबाखू किंवा गुटखा खाल्ल्यानंतर काहीवेळाने थुंकता तसाच तुम्ही ओवा देखील फेकू शकता.

ओव्याच्या सेवनामुळे तुम्हांला हळूहळू तंबाखू खाण्याच्या सवयीपासून सुटका मिळू शकते.

नियमित दोन दिवसाच्या या उपायाने तुम्हांला तंबाखू, गुटख्याचं व्यसन कमी होण्यास मदत होत असल्याचे दिसून येईल नक्की.

तुम्हाला या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेयर करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती वाचण्यास आवडेल ते कमेंट्स मध्ये लिहा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top