Uncategorized

दोन-दोन मुलांच्या आई झालेल्या आहेत या अभिनेत्री, पण यांच्या सौंदर्याच्या पुढे फेल आहेत दीपिका आणि कटरिना

बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे सौंदर्य आणि फिटनेस अप्रतिम असते. यांच्या फिटनेसला पाहून भारतातील सगळ्या मुली फिट राहण्यासाठी इंस्पायर होतात. पण या अभिनेत्रींचे सौंदर्य आणि फिटनेस त्यांना सहजासहजी मिळत नाही त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागते. जिम मध्ये जाऊन तासंतास घाम गाळावा लागतो त्यानंतर या अभिनेत्रींना अशी कमालीची फिगर मिळते. बॉलिवूड मधील यंग अभिनेत्री तर फिटनेस काळजी घेतातच पण काही अभिनेत्री अश्या देखील आहेत ज्या दोन-दोन मुलांच्या आई झाल्या नंतर देखील आपला फिटनेस सांभाळून आहेत आणि या यंग अभिनेत्रींना देखील मात देत आहेत. यांचे सौंदर्य आणि फिटनेस पुढे बॉलिवूडच्या सगळ्या नवीन अभिनेत्री देखील फेल आहेत असे म्हंटले तर अतिशयोक्ती होणार नाही. चला पाहू या लिस्ट मध्ये कोणकोणत्या अभिनेत्रींचे नाव शामिल आहे.

रविना टंडन

रविना टंडन चे नाव बॉलिवूडच्या सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री मध्ये घेतले जाते. 90 च्या दशका मध्ये रविना ने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिच्या ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्याने तिला तरुणांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवून दिले होते. ती या गाण्यात पिवळ्या रंगाच्या साडी मध्ये अतिक्षय सुंदर दिसत होती. रविना टंडन ला दोन आपत्य आहेत ज्यांची नावे रक्षा थडानी आणि रणबीर थडानी आहे. दोन मुलांची आई असून आणि वयाच्या 44 व्या वर्षात देखील ती तेवढीच सुंदर दिसते.

भाग्यश्री

फिल्म ‘मैने प्यार किया’ पासून सगळ्याची आवडती झालेली भाग्यश्री एक सुंदर अभिनेत्री आहे. भाग्यश्री देखील दोन मुलांची आई आहे. तिचा 23 वर्षांचा एक मुलगा आहे ज्याचे नाव अभिमन्यू आहे आणि एक 21 वर्षांची मुलगी आहे जिचे नाव अवंतिका आहे. भाग्यश्री ला पाहून कोणीही म्हणणार नाही कि ती 49 वर्षांची आहे आणि दोन तरुण मुलांची आई देखील आहे.

काजोल

काजोल भारतीय फिल्म मधील एक प्रसिद्ध नाव आहे. काजोल चे नाव उत्तम अभिनेत्री म्हणून घेतले जाते. तिने आपल्या करिअर मध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. काजोल ने अभिनेता अजय देवगण सोबत लग्न केले आहे. काजोल ला दोन आपत्य आहेत ज्यांची नावे न्यासा आणि युग आहेत. 44 वर्षीय काजोल अजूनही सुंदर आणि चार्मिंग दिसते.

जुही चावला

90 च्या दशका मध्ये जुही चावला बॉलिवूड मधील मोस्ट डिमांडिंग ऐक्ट्रेस होती. जुही चावला ने 1995 मध्ये बिजनेसमैन जय मेहता सोबत लग्न केले. लग्ना नंतर जुही अत्यंत कमी चित्रपटातून दिसली. जुही चावला ला देखील दोन आपत्य आहेत ज्यांची नावे जहान्वी आणि अर्जुन मेहता आहे. दोन मोठ्या मुलांची आई असलेली 51 वर्षीय जुही आजही तेवढीच बबली दिसते.

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित ने अमेरिकाचे सर्जन डॉक्टर श्रीराम नेने यांच्या सोबत 1999 मध्ये लग्न केले होते. माधुरी बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री होती आणि आजही आहे. 51 वर्षांची झाल्या नंतर देखील तिच्या सौंदर्यात कमी नाही आली आहे. आजही तिच्या हास्यांवर लाखो फिदा होतात. माधुरीचे दोन मुले आहेत अरिन नेने आणि रायन नेने.

Related Articles

Back to top button