या उपायांना शुक्रवारी केल्याने सगळ्या इच्छा होतात पूर्ण, माता लक्ष्मी नेहमी राहते सोबत

आर्थिक प्रगतीची इच्छा असलेले लोक माता लक्ष्मीची पूजा अर्चना करतात. माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी शुक्रवार हा उत्तम दिवस मानला जातो. असे बोलले जाते कि जर शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची आराधना केली तर यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपली धन प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त काही उपाय असे आहे जे शुक्रवारी केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते.

शास्त्रा मध्ये असे काही सोप्पे उपाय सांगितले आहेत जे धनप्राप्तीसाठी प्रभावी मानले जातात. जर या उपायांना व्यक्तीने केले तर त्याच्या जीवनामध्ये पैश्याच्या संबंधित समस्यां दूर होऊ शकतात. जर आपल्याला देखील पैश्यांच्या संबंधित काही समस्या त्रस्त करत असतील आणि आपल्याला धनवान बनायचे असेल तर आज आपल्याला शुक्रवारी केले जाणारे काही उपाय आहेत जे आपण करू शकता. हे उपाय करून आपण आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकता आणि आपल्या सोबत माता लक्ष्मी नेहमी राहील.

धनवान बनण्यासाठी शुक्रवारी करा हे उपाय

जर आपल्याला धन प्राप्ती करायची असेल तर शुक्रावरच्या दिवशी आपल्या घरातील पूजा स्थानी धन प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची स्थापना करावी आणि गाईच्या तुपाचा दोन वातीचा दिवा माता लक्ष्मी समोर लावावा. आपण हा उपाय केल्याने यामुळे धन आगमन वाढते.

आपण शुक्रवारच्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला मोगऱ्याचे अत्तर अर्पित करावे. याच सोबत जर आपण महालक्ष्मीला गुलाबाचे अत्तर अर्पित केले तर यामुळे रति आणि काम सुख मिळते. माता लक्ष्मीला केवड्याचे अत्तर अर्पित केल्याने मानसिक शांती प्राप्त होऊ शकते.

जर आपण आपल्या नशिबाला प्रबळ बनवू इच्छिता तर त्यासाठी शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मी करताना चंदन अत्तर अर्पित करावे, यामुळे भाग्योदय होतो.

जर आपल्याला वैवाहिक जीवन परिपूर्ण आणि समृद्ध बनवायचे असेल तर आपण शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला कोणत्याही मंदिरा मध्ये सोळा शृंगाराची सामग्री अर्पित करावी. यामुळे धन प्राप्ती सोबतच वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढते.

व्यक्ती आपल्या जीवनामध्ये धन कमावण्याचे शक्य तेवढे प्रयत्न करत असतो. त्याची इच्छा असते कि त्याच्या घरामध्ये कधीही पैश्याची कमी होऊ नये, त्यामुळे आपण शुक्रवारच्या दिवशी 11 लहान आकाराचे नारळ घ्यावे आणि त्यास एका पिवळ्या कपड्यात बांधून घरातील स्वयंपाकघरात पूर्व दिशेच्या कोपऱ्यात बांधावे. जर आपण या उपायाला केले तर यामुळे आपल्या घरा मध्ये धनधान्याची कमी होणार नाही आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घर आणि कुटुंबावर नेहमी राहील. यामुळे माता अन्नपूर्णाचे आशीर्वाद देखील मिळतील.

हिंदू धर्मा मध्ये गाईला मातेचा दर्जा आहे. असे बोलले जाते कि गाईमध्ये देवता वास करतात. जर आपण शुक्रवारच्या दिवशी गायीला ताजी पोळी गूळ मिश्रित करून खाण्यास दिल्याने आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते.