Connect with us

शास्त्रा अनुसार महिलांना चुकूनही बोलू नये हे 2 शब्द, महालक्ष्मी होईल दुखी

Astrology

शास्त्रा अनुसार महिलांना चुकूनही बोलू नये हे 2 शब्द, महालक्ष्मी होईल दुखी

सुरुवाती पासूनच भारतामध्ये महिलांना देवीचे रूप मानले जाते महिलांना नेहमी घरातील लक्ष्मी या नजरेने पाहिले जाते. यामुळे महिलांना देवीचा दर्जा दिलेला आहे. एक महिलाच अशी असते जी दोन कुटुंबाना एकत्र आणते. आईच्या रुपात मुलांना जन्म देते तर मुलीच्या रुपात कुटुंबाचे नाव मोठे करते. तर पत्नी बनून आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करते. एक महिलाच असते जी घरामध्ये आनंद घेऊन येते त्यामुळे महिलेला देवी समान मानले जाते. महिले मध्ये एवढी क्षमता असते कि तिने मनात आणले तर एखाद्या घराला स्वर्ग बनवू शकते आणि जर ठरवले तर स्वर्गा सारख्या घराला देखील नरकबनवू शकते. महिले मध्ये अनेक गुण असतात ज्याची कोणीही कल्पना देखील करू शकत नाही.

महिला अत्यंत सहनशील आणि धैर्यवान असते पण अनेक वेळा असे होते कि आपण महिलांची इज्जत करण्या एवजी त्यांना अपशब्द बोलतो जे आपल्याला चुकुनही बोलले नाही पाहिजेत. अश्या शब्दांचा वापर टाळला पाहिजे ज्यामुळे महिलांच्या सन्मानाला ठेच लागेल आणि त्यांचे मन दुखावले जाईल. यासर्वांचा विचार करता आज आम्ही या लेखामध्ये अश्या दोन गोष्टी बद्दल सांगत आहोत ज्या शास्त्राच्या अनुसार महिलांना चुकूनही बोलल्या नाही पाहिजेत. जर तुम्ही या शब्दांचा वापर केला तर महिलांचा अपमान होतो.

चला पाहू शास्त्रा नुसार महिलांना कोणते दोन शब्द चुकुनही बोलले नाही पाहिजे

या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीची आपआपली काही ना काही मजबुरी असते आणि त्या मजबुरीमुळे ती व्यक्ती कोणतेही कार्य करते त्यामुळे कोणतीही महिला आनंदाने वेश्याव्यवसाय करत नाही त्यामागे त्या महिलेची काही मजबुरी आवश्य असते त्यामुळेच ती या मार्गावर असते. त्यामुळे कोणतीही महिला वेश्या जरी असली तरी तिला वैश्या शब्द ऐकणे आवडत नाही यामुळे चुकूनही महिलेला हा शब्द बोलू नये. त्या महिलेला दुखवू नये होऊ शकते तुम्ही बोललेल्या शब्दाने ती दुखावली जाईल आणि तिच्या मनाने दिलेला शाप तुमचे संपूर्ण आयुष्य खराब करेल. त्यामुळे अश्या शब्दाचा वापर करू नये ज्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल.

तुम्ही कोणत्याही महिलेला कधीही वांझोटी बोलू नका कारण सर्व महिलांना आपण आई बनावे असे वाटते. परंतु काही नैसर्गिक कमीमुळे कधीकधी ते शक्य नसते ज्यामुळे त्यांना मातृत्व मिळत नाही. ज्याचे दुखः त्या महिलांना देखील असते. अश्या स्थिती मध्ये जर तुम्ही जर त्या महिलेला वांझोटी बोलले तर तिला अजून जास्त दुख होईल. ज्यामुळे कदाचित तुम्हाला ती काही उलटे बोलेल किंवा शिव्याशाप देईल अश्या दुखी महिलांचा श्राप रिकामा जात नाही कारण त्या दुखी मनाने आपल्या अतरात्म्याने श्राप देतात. त्यामुळे त्यांना चुकूनही दुखवू नये.

Continue Reading

Trending

Advertisement
To Top