viral

पूर्ण शहरात होत आहे या ऑफिसरची स्तुती

मोतीहारी (बिहार) स्वच्छता अभियानाला गती देत प्रखंड क्षेत्रच्या राजकीय उत्क्रमित मध्य विद्यालय नरकटिया (उर्दू) चे निरीक्षक डीएम रमन कुमार यांनी केले. या शाळे मध्ये डीएम दोन तास राहिले. यादरम्यान त्यांना शाळे मध्ये काहीही चांगले वाटले नाही. संपूर्ण निरीक्षणा दरम्यान डीएम कधी सफाई कर्मचारी तर कधी शिक्षक तर कधी पालकाच्या भूमिकेत दिसले. एकीकडे प्रशासक म्हणून बोलत होते तर दुसरीकडे मुलांच्या सोबत एक मित्र म्हणून वागत होते. निरीक्षणाच्या दरम्यान साफसफाई, विद्यालया मध्ये दिले जात असलेले शिक्षण, खान-पान परिसर सह टॉयलेट सुध्दा साफ करतांना दिसले. डीएम ने शिक्षकांना स्वच्छते बद्दल सल्ले दिले. ऑफिसरच्या या कामा बद्दल पूर्ण शहरा मध्ये त्यांची स्तुती होत आहे.

निरीक्षणासाठी आलेल्या डीएम ने स्वतः साफ केले टॉयलेट

निरीक्षण करताना डीएम यांना कैम्पस मध्ये सगळीकडे अस्वच्छता दिसली त्यास साफ करण्यास त्यांनी सुरुवात केली. सफाई करताना डीएम यांनी स्वतः कुदळ उचलली तसेच परिसरातील घाण साफ करण्यास सुरुवात केली. त्यांनी शाळेच्या टॉयलेट कडे आपला मोर्चा वळवला तेथे देखील त्यांना अस्वच्छता दिसली ती पाहून त्यांनी स्वतः बादली मध्ये पाणी घेतले आणि टॉयलेट स्वच्छ करू लागले. डीएम हे करत असल्याचे पाहून विद्यार्थी त्यांना मदत करू लागले तसेच त्यांनी क्लास रूम देखील साफ केले.

अंघोळ न करता शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना अंघोळ घातली

त्यांचे लक्ष विद्यार्थ्यांकडे गेले. त्यांनी विद्यालयात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना अंघोळी बद्दल विचारले. ज्या विद्यार्थ्यांनी स्नान केले नव्हते त्यांना स्वतः स्नान करवून आपल्या कडील टॉवेल मागवून त्यांचे शरीर कोरडे केले. विद्यालया मध्ये पालकांच्या सोबतच सामान्य लोकांची देखील गर्दी झाली. त्यांच्या सोबत डीएम ने ओडीएफ तसेच स्वच्छते बद्दल थेट संवाद साधला आणि सांगितले निरोगी जीवन सगळ्यांनाच हवेहवेसे वाटते. निरोगी जीवनाचे मूळ स्वच्छता आहे.

शिक्षकांना दिला सल्ला

डीएम ने शाळेत उपस्थित असलेल्या शिक्षकांना देखील खडसावले. त्यांनी सांगितले सगळ्या सरकारी विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी वातावरण निर्माण करणे त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे मुलांना अनुशासित बनवणे, चांगले शिक्षण देणे, त्यांना स्वच्छ ठेवणे तसेच निरोगी कसे ठेवावे याची माहिती देणे शिक्षकांची जबाबदारी आहे. यामध्ये पालकांची देखील महत्वाची भूमिका आहे. पालकांनी देखील स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.

विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनवणे

पालकांनी मुलांना जबाबदार नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. डीएम यांनी शिक्षकांना सांगितले कि यासाठी लोकांना कोणतीही मदत लागली तर ती देण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करा. शिक्षकांनी सकाळी प्रार्थना लाउडस्पीकर लावून तसेच मुलांना बोलायला लावून पाठ करून घेण्यास देखील सांगितले.


Show More

Related Articles

Back to top button